जळोची: (फलटण टुडे वृत्तसेवा )
येथील विद्या प्रतिष्ठानच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात इ.स. २००१ साली कला शाखेतून पदवी घेऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांनी प्राध्यापकपदी पदोन्नती झालेल्या शिक्षकांचा सन्मान केला.
येथील महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक असलेले उपप्राचार्य डॉ. शामराव घाडगे, हिंदी विभागाचे प्रमुख डॉ. राजेंद्र खैरनार व इंग्रजी विभागातील डॉ. संजय खिलारे यांची पदोन्नती होऊन प्राध्यपकपदी निवड झालेली होती. यानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला.
प्रसंगी झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी मनोगत व्यक्त करताना डॉ. शिंदे यांनी महाविद्यालयाच्या वाटचालीचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, “सत्तर – ऐंशी विद्याथीसंख्येवर सुरु झालेले हे महाविद्यालय आता राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वत:चा ठसा उमटवू लागले आहे. या महाविद्यालयात विद्यापिठात परिवर्तीत होण्याच्या क्षमता आहेत. तसेच महाविद्यालयाच्या उन्नतीसाठी माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.”
यावेळी माजी विद्यार्थ्यांनी त्यांच्या महाविद्यालयीन जीवनाच्या आठवणींना उजाळा दिला. महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी ऍड. सुनिल वसेकर यांची जिल्हा सरकारी वकील म्हणून नियुक्ती व सुरेंद्र शिरसट यांनी पी.एच.डी. पदवी प्राप्त केल्या बद्दल त्यांचाही सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. शामराव घाडगे, डॉ. राजेंद्र खैरनार, संजय खिलारे, प्रा. पंढरीनाथ साळुंखे, आनंदा गांगुर्डे, विद्या प्रतिष्ठान माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष भगवान चौधर तसेच अनेक माजी विद्यार्थी यांनी मनोगत केले. प्रसंगी डॉ. सुनिल ओगले, प्रा. सौ. चिमणपुरे, डॉ. राहुल तोडमल, प्रा. वाबळे हे याप्रसंगी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन विद्या प्रतिष्ठान माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष भगवान चौधर, अनिल जाधव, मंजुश्री ढवळे-तावरे, स्नेहा घोगरे- तावरे शीतल काटे, विक्रम निंबाळकर व ऍड. शिवकांत वाघमोडे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जबीना शेख यांनी केले. प्रास्ताविक डॉ. सुरेंद्र शिरसट यांनी तर आभार ऍड. पांडुरंग जगताप यांनी मानले.