युवा पिढीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर मार्गक्रमण करणे आवश्यक : अँड. दिपक रुद्रभटे

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करताना मान्यवर

फलटण (फलटण टुडे ) :
छत्रपती शिवाजी महाराज यांनी जगाला मार्गदर्शक असा इतिहास रचला असून धर्म सहिष्णुते चे पालन करीत, जातीभेदाला थारा न देता स्वराज्याची स्थापना केली .आजच्या युवा पिढीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर मार्गक्रमण करणे आवश्यक असल्याचे मत प्रथितयश विधीतज्ञ व छत्रपती शिवाजी वाचनालयाचे माजी सेक्रेटरी ऍड दीपक रुद्रभटे यांनी व्यक्त केले.
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शिवाजी वाचनालय येथे आयोजित कार्यक्रमात ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
ते पुढे म्हणाले,जगभरात छत्रपतींचा पराक्रम,संयम,आदर्श आणि कीर्ती पोहचली असून जगाने त्यांचा आदर्श स्वीकारला आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रूपाने युगपुरुष अवतरला असून,गुलामगिरी ची मानसिकता असताना त्यांनी कोणताही धर्म भेद व जाती भेद न करता जनतेला गुलामगिरी तुन मुक्त करून जगाला मार्गदर्शक असा इतिहास रचला समाजातील विविध घटकांना एकत्र करून संघर्षमय असा यशस्वी लढा दिला असल्याचे ऍड रुद्रभटे यांनी स्पष्ट केले.
यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष ऍड अजित शिंदे, विलासराव बोरावके(नाना)यांनीही आपले विचार व्यक्त केले.
प्रारंभी ऍड रुद्रभटे यांच्या हस्ते छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले यावेळी चेअरमन अजित शिंदे संचालक विलासराव नाना बोरावके ,रवींद्र बर्गे, रवींद्र फौजदार, सुभाष भांबुरे महेश साळुंके,अंकुश गंगतिरे, सुनील पवार,मंगेश पवार यांच्यासह वाचक व परीसरातील नागरिक उपस्थित होते.प्रास्ताविक श्रीकृष्ण देशपांडे यांनी केले तर आभार सुभाष भांबुरे यांनी मानले
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!