पुस्तक -आत्मप्रेरणा लेखक लक्ष्मण जगताप मोबाईल-९४२३२४९९९६ (उपशिक्षक ता.बारामती)
लेखक लक्ष्मण जगताप यांनी ‘दै.सकाळ” मध्ये आत्तापर्यंत मुक्तपीठ, आधारवड, मोकळे व्हा, गुदगुल्या, इत्यादी सदरामध्ये लेखन केलेले आहे. बारामती तालुक्यात वाचन प्रेरणा हा उपक्रम नेहमी राबवतात. त्याचप्रमाणे आपल्या प्रत्येक वाढदिवसाला अनेक पुस्तक वाटप करत असतात.”आत्मप्रेरणा “हे त्यांच्याकडून मला भेट मिळालेले हे पुस्तक.
आत्तापर्यंत वाचलेल्या पुस्तकांपैकी विचार करायला लावणारे, ज्वलंत ,वास्तववादी प्रश्नावर आधारीत असणारे, नैराश्यातून बाहेर काढणारे *आत्मप्रेरणा* हे पुस्तक आजच्या तरुणांमध्ये वाढणारे नैराश्य,नकारात्मक बाबी याचे निरीक्षण करून त्यांची कारणे व उपाय अतिशय सुंदर रितीने या पुस्तकात लेखकाने वर्णन केले आहे.
*जीवन खुप सुंदर आहे त्याला आणखीन सुंदर कसे बनवायचे, ते “आत्मप्रेरणा “हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतं*. जिद्द,चिकाटी, कष्ट,या त्रिसूत्री कशाप्रकारे आपणाला आयुष्यात यशस्वी करतात.याचे सुंदर वर्णन या पुस्तकामध्ये केलेले आहे.
सुंदर, वास्तव, ज्वलंत असे दाखले,उदाहरणे तसेच लक्ष्मण जगताप सर हे *स्वतः शिक्षक वाचक,चिंतनशील,असल्यामुळे त्यांनी अतिशय बारकावे हेरून अभ्यासपूर्वक* या पुस्तकामध्ये लिहिलेले दिसून येतात.
*आत्मप्रेरणा* ” या पुस्तकामध्ये एकूण ३९ घटक असून प्रत्येक व्यक्तीच्या दैनंदिन जीवनात हे घटक येतच असतात.प्रत्येक घटकाचे इतभूत सूक्ष्म पद्धतीने वर्णन केलेले आहे. प्रत्येक पानावर असणारे बोलके चित्र वाचकाला त्या गोष्टीचा, त्या घटकांचा संपूर्ण सार समजून येतो. हे पुस्तक शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या अनेक समस्या संदर्भात असल्याने शिक्षकांना व पालकांना अतिशय माहितीपूर्ण ,फायदेशीर आहे. तसेच सर्व व्यक्तींसाठी वाचनीय आहे.
*आत्मप्रेरणेचे झरे*
यामध्ये प्रत्येक व्यक्तीकडे आत्मविश्वास असेल तर कोणतीही गोष्ट सहज शक्य आहे. *मनातून हरलेला व्यक्ती कधीच यशस्वी होऊ शकत नाही*. ज्याच्या अंगी “आत्मबल” म्हणजे “आत्मप्रेरणा” असते. तो कधीच हार न मानत नाही.तो सतत प्रयत्न करत असतो.
*उदाहरणार्थ* – जसप्रीत बुमरा हा क्रिकेटर टीव्हीवरच सामने बघून क्रिकेट शिकला आणि आज जगातील सर्वोत्तम गोलंदाज म्हणून नावारूपाला आला. तुम्ही घेतलेल्या चांगल्या निर्णयात लोकांनी किती नाव ठेवून द्या परंतु तुमच्या अंगी असणारी “आत्मप्रेरणाच” तुमचे मनोबल वाढवते.
*मुलांशी संवाद साधूया*”
या घटकांमध्ये मुलांना पाहिजे त्या वस्तू आपण मिळवून दिल्या म्हणजे आपली जबाबदारी पार पडली. असं पालकांना वाटणे पूर्णतः चुकीचे आहे. कारण *संपत्ती साठवून ठेवण्याच्या नादात आपले पाल्याकडे दुर्लक्ष होते*. शालेय वयातील मुलांशी रोज आपला प्रेमळ संवाद असला पाहिजे .त्यांना मायेने जवळ घेऊन त्यांच्याशी मनमोकळेपणाने काही समस्या असतील तर जाणून घेतल्या पाहिजे. तसेच नकार पचवण्याची सवयही लावणे आवश्यक आहे.
*चांगुलपणा शोधूया* ”
माणूस म्हटलं की गुण-दोष आलेच. कोणीही स्वतःला सर्वगुणसंपन्न म्हणू शकत नाही. प्रत्येक माणसात चांगले गुण असण्याबरोबर काहीतरी दोष असतात. *माणसातील चांगुलपणा आधी पाहावा.आणि मग दोष पाहावा*. कारण चांगुलपणा पाहिल्याने तो माणूस आपल्याला आवडू लागतो,चांगल्या विचारांची देवाण घेवाण होते.
*उदाहरणार्थ*- मूर्तिकार दगडाचा नको असलेला भाग काढून टाकतो. आणि सुंदर मूर्ती आकाराला आणतो.तसेच आपणही आपल्या आवडत्या व्यक्तीचा नकोसा वाटणारा भाग दुर्लक्षित केला तर या जगामध्ये वाद-विवाद होणारच नाही.
विहीर खोदताना कामगार दगड-माती बाजूला सारून पाण्याचा शोध घेतो आणि म्हणून आपणाला गोड पाणी मिळते की जे आपली तृष्णा भागवते. त्याच पद्धतीने माणसातील चांगुलपणा आनंददायी जीवन बनवतो.
*मोकळेपणाने बोला* ”
प्रत्येकाचं मन वेगळ्या प्रकारचं विचार करून प्रत्येकाबद्दल वेगवेगळे मत बनवीत असते.भूतकाळातील कटू आठवणी उगाळत बसल्याने, वर्तमानातील आनंद ,आनंदाचे क्षण आपण गमावत असतो. घटना घडून गेल्या आहेत त्याचा विचार न करता चर्चा केल्याने मन मोकळे होते, गैरसमजुतीतून काही गोष्टी झाल्या असतील तर एकमेकांना समजवा.
*मुलांचे संगोपन करताना* ”
बालकांनी मुलांचे संगोपन करताना *अति लाड करू नयेत. त्यांच्यावर असणार्या प्रेमापोटी आपण त्यांना चुकीची सवय लावून तर नाही ना ठेवत याचा विचार केला पाहिजे*. मुलांशी बोलून त्यांना माया, प्रेम या गोष्टी देऊन त्यांना आपलंसे केलं पाहिजे.मुलांना माया, प्रेम भरपूर द्या. पण त्या बरोबरच वास्तवाची जाणीव सुद्धा करून दिली पाहिजे.
*तुलना नको प्रेरणा हवी*”
शेजारच्या मुलाला पैकीच्या पैकी मार्क पडले. म्हणून आपल्याही मुलाला तेवढेच मार्क पडले पाहिजे.ही बाब मनातून काढून टाकली पाहिजे.
*परंतु तुलना खेळ खूप विचित्र आहे*. त्या खेळात अडकलेलच न बरं.मुलांच्या अभ्यासाबाबत तुलना करून त्याच्यावर एक प्रकारचा अन्याय केल्यासारखे असते*. प्रत्येक मूल हे वेगळे असते. *एखादा मुलगा अभ्यासात मागे असेल तर तो खेळात चांगल्या प्रकारे खेळ करू शकतो*.
एक विद्यार्थी अभ्यासात कमी होता परंतु संगणकावर तो आवडीने काम करायचा. शाळेतील लॅब मधील एक संगणक बिघडला. सर्वांनी खूप प्रयत्न केले. पण दुरुस्त झाला नाही . शेवटी त्याच मुलाने तो संगणक दुरुस्त केला.आणि संगणक सुरू झाला
*किमया प्रोत्साहनाची* “
शिक्षक व पालकांना आपल्या मुलांच्या मनामध्ये चालत असणारी प्रत्येक गोष्ट लक्षात आली पाहिजे.आणि त्या बाबी लक्षात घेऊन त्यांची आवड कशात आहे. त्या दृष्टीने त्याला मार्गदर्शन करून प्रयत्न करणे गरजेचे आहे.
*उदा*-शिवाजी महाराज एका गावात गेले होते. तेथे एक मुलगा बहुरुपी सोंग घेऊन लोकांचे मनोरंजन करीत होता. त्याच वेळी त्यांनी त्याचे निरीक्षण केले आणि हा मुलाला गुप्तहेर खात्यात उत्तम काम करू शकतो म्हणून
त्यांला आपले गुप्तहेर खात्यात घेतले.तोच मुलगा पुढे इतिहासात बहिर्जी नाईक म्हणून प्रसिद्ध झाला.
*जबाबदारी लहान वयातच देऊ*”
सर्वच गोष्टी मुलांच्या हातात जर आणून दिल्या तर मुले आळशी बनतात. परिस्थितीची जाणीव राहत नाही. *जबाबदारी जर लहान वयात मिळाली तर त्या जबाबदारीची जाणीव मुलांना होते*. म्हणून लहान मुलावर छोट्या मोठ्या कामाची जबाबदारी सोपवली पाहिजे यातून त्यांचे सामर्थ्य वाढेल, आत्मविश्वास वाढेल.
*गगनभरारी स्वप्नांची* “
मुलांनी नेहमी मोठी स्वप्ने पहावीत .ही स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी अहोरात्र परिश्रम घ्यावेत. ध्यास घ्यावा स्वप्नपूर्तीच्या कमळाला सुंदर दिसण्यासाठी चिखलात रहावे लागते ना?
*उदा*- औरंगाबादचा सनी दौंडकर हा मुलगा लहानपणापासून त्याला वाचनाचा आणि लिखाणाचा छंद.पाचवीत असताना त्यांनी विज्ञान कथा लिहिल्या. घरातून त्याला प्रोत्साहन मिळाले.आणि त्याचे स्वप्नाने भरारी घेतली. नववीत असताना त्याने विज्ञानावर आधारित
” *थियरी वर्सेस थियरिज ” हे पुस्तक लिहिले*.
*आनंदी जगणं असतं तरी काय*?”
जगण्यासाठी माणसांना काय लागते. अन्न ,वस्त्र ,निवारा. पण पुष्कळदा या गरजा पूर्ण होऊनही आपण भौतिक सुखाच्या मागे धावतो आणि आपली जगणं हे राहूनच जाते. *यासाठी आपण स्वतःवर प्रेम करायला शिकले पाहिजे.स्वतःच्या प्रेमात पडणे म्हणजे आपल्यातील अमर्याद ताकद आपण ओळखतो*. सकाळी पडलेले सावली
ज्याप्रमाणे एका जागी रहात नाही. त्याचप्रमाणे आयुष्यात सुख दुःखाचा खेळ चालूच राहतो प्रश्न हाच आहे की हा खेळ आपण खेळतो कसा? याचा आनंद घेतो कसा? जगायला खूप पैसा, संपत्ती असावे असे अजिबात नसते.
*गमक यशाचे* “
आपल्या मनाशी असणारे ध्येय पूर्ण करण्यासाठी आपल्या अंगी चिकाटी नसेल तर ध्येय कसे साध्य होणार ? अंगी प्रचंड आत्मविश्वास, चिकाठी, धैर्य या गोष्टी असाव्याच लागतात.
*उदा*- विजेच्या दिव्याचा शोध लावताना थॉमस अल्वा एडिसन 999 वेळा प्रयत्न करूनही अपयशी ठरला.परंतु 1000 वा प्रयत्न यशस्वी ठरला. केवळ यश मिळवण्यासाठी टंगळमंगळ, टोलवाटोलवी, बघू करू?असे करणे म्हणजे चिकाटी पासून दूर जाणे होय.
*जगणे करूया टेन्शन फ्री*
जो काम करतो तो चुकतो. याउलट जो काहीच काम करत नाही तो चुकत नाही. त्यामुळे चूक झाली म्हणून खूप घाबरायचं नाही. *माणूस म्हटल्यावर चुका होणारच.पण त्यात नंतर सकारात्मक सुधारणा होणे गरजेचे असते*. काहींना आपली चूक झाली तर कमीपणा वाटतो. पण जर सकारात्मक निर्णय घेतल्या तर त्यातून स्वतःच्या प्रगतीला खूप मोठी संधी प्राप्त होते.
*अहंकार ठरवतोय नात्यातील दुरावा* “
आपल्या हाताची बोटे ही सारखी नसतात. मंग सर्व माणसे सारखी कशी असणार? त्यात *अहंकार हा माणसाचा खूप मोठा शत्रू आहे*. अहंकारामुळे फायदा होण्याऐवजी तोटाच जास्त होतो. माझेच खरं , मलाच सगळे समजते .अशा अहंकारी स्वभावाची माणसे पुढे एकटी पडतात.आयुष्य आनंदी होण्यासाठी अहंकार आयुष्यातून वजा केला पाहिजे म्हणजे बाकी फक्त आनंद उरेल.
*आयुष्यात यशस्वी होण्याचा राजमार्ग*”
आपल्यामध्ये असणारी सुप्त शक्ती आहे. त्याचे सामर्थ्य अद्भूत, आणि विराट आहे .आपल्याला ती शक्ती ओळखायची आहे. त्या शक्तीच्या जोरावरच आपल्याला स्वतंत्र ओळख निर्माण करायची आहे.
*उदा*- रेल्वे स्टेशन वर गाणं गाऊन गुजराण करणाऱ्या राणू मंडल यांच्या गायनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला काय,आणि रातोरात राणू मंडल स्टार झाली.प्रत्येकाच्या अंगात अशी एक सुप्त शक्ती दडलेली असते. ती फक्त आपण ओळखली पाहिजे.
*सुख दडलंय तरी कशात*”
प्रत्येक माणसाला आयुष्यात सुख हवं असतं.आणि ते मिळवण्यासाठी तो अनेक प्रयत्न करत असतो.परंतु सुख हे आपल्या मानण्यात आहे.
*उदा*- आईला बाळाच्या गोड हसण्यात सुख वाटते. लहान मुलाला बर्फ गोळा खाण्यात आनंद वाटतो. एखाद्या गृहिणीला सुग्रास भोजन करून खाऊ घालण्यात सुख वाटते.एक प्रकारे म्हणजे भौतिक सुख आणि सुखासाठीच माणूस जीवाचा आटापिटा करतो.
मला गाडी, बंगला पाहिजे.याने खूप सुख मिळत नाही.
आहे त्यातच समाधान मानणे तरच माणूस सुखी होतो.
सिंधुताई सपकाळ यांनी अनाथ मुलांची आई होणे यात
त्यांना सुख वाटते.
*येताना आलेला माणूस आणि जाताना जाणारा माणूस मोकळा जाणार ना*? मग एवढा अट्टाहास कशासाठी ?आज जर आपण बघितलं तरी दुनिया, भौतिक गोष्टीच्या मागे जाऊन आपल्या माणसांना दूर होत असतात.
वरील प्रमाणे एकापेक्षा एक वास्तववादी, ज्वलंत,भविष्यात गरजेच्या अशा प्रेरणादायी अशा कितीतरी घटकांचा समावेश लेखकाने वेगवेगळी उदाहरणे, दाखले देऊन अतिशय
सुंदररित्या मांडला आहे. हे पुस्तक जर आपण वाचलं नाही तर काहीच वाचलं नाही. हे पुस्तक केवळ पुस्तक नसून आपल्या जगण्याला एक नवीन दिशा देणारे अमृतमय जीवनच आहे.
लेखक लक्ष्मण जगताप यांनी *आत्मप्रेरणा* “हे पुस्तक अतिशय अभ्यासपूर्ण, चिंतन करून वास्तव व दर्जेदार लिखाणातून लिहिलेलं हे पुस्तक सर्वांनी आवश्य वाचावे .शिक्षक व पालकांसाठी तसेच मोठ्या व्यक्तींसाठी अतिशय प्रेरणादायी, महत्वपूर्ण माहिती देणारे पुस्तक सर्वांनी संग्रही ठेवावे.
पृष्ठसंख्या-152
किंमत -160
अभिप्राय शब्दांकन
गणेश तांबे*. *(सिंधुसूत.)
अप्रतिम शब्दांकन वैचारिक विचार मंथन . तरुणांना स्फूर्ती देणारा पुस्तक परिचय आहे.
जबरदस्त विचार मंथन…..वाचनीय असणार…नक्कीच…!!!
खूपच छान प्रेरणादायी लेखमाला
Commendable
खुपच मार्मिक शब्दांकन…….पुस्तक कधी वाचेन असं वाटायला लागलेय…..