मुंबईतील उर्वरीत कोळीवाड्यांचे सीमांकन जलदगतीने पूर्ण करावे – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

मुंबई शहर आणि उपनगरातील कोळीवाड्यांच्या सीमांकनाबाबत बैठक संपन्न

          मुंबईदि. १६ : मुंबईतील उर्वरीत कोळीवाड्यांचे सीमांकन जलदगतीने पूर्ण करण्यात यावेअशा सूचना पर्यावरण मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना दिल्या.

          मुंबई शहर आणि उपनगरातील कोळीवाड्यांच्या सीमांकनाबाबत पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे आणि मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. अस्लम शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली.

          सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीस मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहलपर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकरमुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकरउपनगर जिल्हाधिकारी मिलींद बोरीकर यांच्यासह संबंधीत विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

          मुंबईतील उर्वरित कोळीवाड्यांच्या सीमांकनासाठी करावयाची प्रक्रिया जलद पूर्ण करण्यात यावी. यासंदर्भात लवकरच पुन्हा आढावा बैठक घेऊन कोळीवाड्यांच्या सीमांकनाबाबत कार्यवाही करण्यात येईलअसे पर्यावरण मंत्री श्री. ठाकरे यांनी सांगितले.

          शहरचे पालकमंत्री श्री. अस्लम शेख म्हणाले कीकोळीवाडेआदिवासी पाडे किंवा गावठाणाचा भाग लगत आहे तिथे कोळीवाड्याचे सीमांकन करणे गरजेचे आहे. मुंबईतील बहुतांश कोळीवाड्यांचे सीमांकन झाले असून उर्वरित कोळीवाड्यांचे सीमांकन करण्यासाठी संबंधीत यंत्रणांनी लवकर सर्वेक्षण करावेअशा सूचनाही श्री. शेख यांनी दिल्या.

          यावेळी मुंबई शहर आणि उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी दोन्ही जिल्ह्यातील कोळीवाडे सीमांकनाबाबतच्या सद्यस्थितीची माहिती दिली.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!