"झपाटलेला ओ.बी.सी.बलुतेदार" पुस्तकाचे डॉ.बाबा आढाव यांचे हस्ते प्रकाशन

गोखळी( प्रतिनिधी) :
पुणे-राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे  राष्ट्रीय सामाजिक एकात्मता अभियानातर्गत कर्मवीर व योगाचार्य डॉ प्रल्हाद वडगांवकर यांनी लेखन केलेले आणि जेष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉ. श्री पाल सबनीस व प्रा.श्रावण देवरे यांच्या प्रस्तावना लाभलेले *झपाटलेला ओबीसी बलुतेदार* ग्रंथाचे प्रकाशन जेष्ठ समाजसेवक डॉ बाबा आढाव, *घरच्या घरी करण्याजोगे आरोग्य रक्षक सोपे उपचार* ग्रंथाचे प्रकाशन युरो सर्जन एस हॉस्पिटल चे प्रमुख डॉ.सुरेश पाटणकर आणि *सप्तरंग काव्यसंग्रहाचे* प्रकाशन जेष्ठ साहित्यिक डॉ.स्नेहसुधा कुलकर्णी यांचे शुभहस्ते दि.१४/२/२०२१ रोजी सायंकाळी ५ वा. उद्यान प्रसाद मंगल कार्यालय ,पुणे येथे शानदारपणे सम्पन्न झाले.
या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून ओबीसी सेवा संघाचे अध्यक्ष प्रदीप ढोबळेजी तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा माहिती अधिकारी,पुणे चे  राजेंद्र सरग ,ऑल इंडिया जैन समाज चे अध्यक्ष डॉ.अशोककुमार पगारीया,माजी न्यायमूर्ती मानधाता झोडगे,ओबीसी संघटना प्रमुख डॉ.पोपट कुंभार, मोहन देशमाने,प्रताप गुरव, लक्ष्मण सुपेकर ,नंदकुमार गोसावी  उपस्थित होते.
यावेळी डॉ पाटणकर म्हणाले की आम्ही डॉक्टर जरी असलो तरी प्रत्येक गोष्टी साठी पेशंट ने डॉक्टर कडे जाऊ नये .पूर्वी आपण आजीचा बटवा उपयोग करीत होतो यापुढे सर्वांनी डॉ.वडगांवकर यांचे पुस्तक वापरावे तसेच ते होमिओपॅथी मधील भीष्माचार्य आहेत असे गौरव उदगार काढले तर डॉ.आढाव, डॉ.कुलकर्णी आणि इजिनयर प्रदीप ढोबळे म्हणाले की आज वडगावकर यांचे 85 वय असताना ही कोव्हिडं काळात वेळेचा सदुयोग करून समाजासाठी हे तीन ग्रंथ निर्माण करून महान कार्य केले तसेच त्यांनी ओबीसी चळवळीसाठी मंडल आयोग लागू करनेपासून आजतागायत काम करीत आहेत तसेच  त्यानी डॉ.बाबासाहेबांच्या जाती निर्मूलन विचाराशी बांधिलकी समजून दोन्ही मुलीचे आंतरजातीय विवाह करून  जातीभेदाच्या पलिकडे जाऊन अखंड मानव जातीचे दर्शन दिल्याचे  म्हटले आहे. 
लवकरच त्यांचे महात्मा फुले यांच्या जीवनावर गीत चरित्र येत असल्याचे  व छत्रपती शाहू महाराज आणि  महात्मा फुले यांचे वर पोवाडे केल्याचे रघुनाथ ढोक यांनी सांगून  ते फुले एज्युकेशन तर्फे  प्रकाशित होत असल्याचे  सांगितले तर प्रकाशक सुनील गायकवाड(उंब्रजकर) यांनी  हे ग्रंथ समाजोपयोगी असून प्रत्येक घरात असावे  असे म्हंटले.
कार्यक्रमाचे स्वागत डॉ. ऊजवला गुळवणी तर सूत्रसंचालन सावित्रीबाई फुले विद्यापीठ चे डॉ.संदीप सांगळे यांनी केले तर आभार संयोजक रघुनाथ ढोक यांनी मानले आणि मोलाचे सहकार्य शेखर बामणे,सेवा ट्रस्ट चे सचिव सौ .शीला वडगांवकर, रमेश कुलकर्णी,सुदाम धाडगे,श्रीकांत गुळवणी,कांचन कुलकर्णी,व आकाश-क्षितिज ढोक यांनी केले.
यावेळी मोठ्या संख्येने विविध ओबीसी संघटनेचे पदाधिकारी,बांधव उपस्थित होते.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!