फलाण (फलटण टुड़े ):
लायनेस क्लब फलटण यांच्या वतीने चि.शौर्य अजित चव्हाण या दिव्यांग विद्यार्थ्यांना श्रवण यंत्रासाठी आवश्यक असणाऱ्या सेल एका वर्षासाठी देण्यात आल्या. तसेच यापूर्वीही अंध विद्यार्थ्यांसाठी अंधकाठी,मास्क उपलब्ध करून देण्यात आले होते. तसेच लायनेस क्लब फलटण हे नेहमीच विविध उपक्रमाद्वारे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात.
या कार्यक्रम प्रसंगी लायनेस क्लब फलटणच्या अध्यक्षा ला.नीलम लोंढे-पाटील यांनी आपल्या मनोगतात,प्राथमिक शिक्षण ही काळाची गरज आहे. तसेच व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाला खूप महत्त्वाचे स्थान आहे.शारीरिक दृष्ट्या सदृढ असलेल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात सहसा अडचण येत नाही. परंतु दिव्यांग विद्यार्थ्यांना नेहमीच शिक्षण घेत असताना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागते. यामध्ये या विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या शैक्षणिक साहित्याचीही नेहमीच गरज भासत असते.त्यामुळे शालेय दिव्यांग विद्यार्थ्यांना नेहमीच शक्य तेवढे सहकार्य करण्याचा आम्ही निश्चितच प्रयत्न करू असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच या मदतीमुळे पालकांना व
विद्यार्थ्यांला खूप आनंद झाला व त्यांनी लायनेस क्लब फलटणचे आभार व्यक्त केले.
या कार्यक्रमाला आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री.गणेश तांबे, अपंग समावेशित शिक्षणाच्या विषय शिक्षिका सौ.मनीषा खुडे मॅडम, लायनेस क्लब फलटण च्या सेक्रेटरी ला.नेहा व्होरा, खजिनदार ला.सुनंदा भोसले, सदस्य ला.प्रीतम लोंढे पाटील,
ला.भाग्यश्री जाधव ,ला.वनिता पवार, ला. सुवर्णा कांबळे तसेच पालक श्री. अजित चव्हाण उपस्थित होते.