मुंबई दि. १५ : माजी मुख्य सचिव अजोय मेहता यांना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाचे (महारेरा) अध्यक्ष म्हणून मंत्रालयात पद व गोपनीयतेची शपथ दिली. महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण अध्यक्ष, सदस्य, अधिकारी व इतर कर्मचारी (नियुक्ती व सेवाशर्ती) नियम 2017 मधील नियम 9(1) व 9(2) मधील तरतुदीनुसार श्री.मेहता यांना शपथ देण्यात आली.
यावेळी मुख्य सचिव संजय कुमार, महारेराचे सदस्य तथा माजी अपर मुख्य सचिव विजय सतबीर सिंग, महारेरा अपिलीय प्राधिकरणाचे सदस्य एस. एस. संधू, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव एस. व्ही. आर. श्रीनिवास तसेच महारेराचे सचिव डॉ. वसंत प्रभू व अन्य वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.