मुंबई, दि. 15 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात प्रकाशक श्री.अशोक कोठावळे यांची ‘भाषा संवर्धनात प्रकाशकाची भूमिका’ या विषयावर विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून तसेच न्युज ऑन एअर या ॲपवरून मंगळवार दि.16 फेब्रुवारी आणि बुधवार दि. 17 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.25 वाजता प्रसारित होणार आहे. निवेदिका श्वेता भालेकर -परब यांनी ही मुलाखत घेतली आहे.
मराठी भाषा समृद्ध करण्यामध्ये प्रकाशकांची भूमिका, प्रकाशक म्हणून येणा-या अडचणी, साहित्याच्या लेखनाचा दर्जा,ऑनलाईन साहित्य मिळत असल्याने प्रकाशकांपुढील आव्हाने, साहित्यिक, प्रकाशकांनी हाताळायचे विषय, मुद्रित शोधनाबद्दलचा चोखंदळपणा, व्याकरणदृष्ट्या सुधारणा, वाचकसंख्या वाढविण्यासाठीचे तसेच भाषा संवर्धनाला चालना देण्यासाठी करण्यात येणारे प्रयत्न आदी विषयांची माहिती श्री. कोठावळे यांनी ‘दिलखुलास’ या कार्यक्रमातून दिली आहे.