चौकट:
ई एस आय’ चे फायदे छोटे आजार साठी सिकनेस बेनिफिट अंतर्गत प्राथमिक उपचार साठी 70% व मोठ्या आजार साठी 80% पगार देण्याची तरदूत आहे,महिला कामगारांना प्रस्तुती साठी खास सवलत व 2 अपत्ये असल्यास 6 महिने पगार,काम करताना कामगारांचा मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास पेन्शन योजना व अंत्यसंस्कार साठी 15 हजार रुपये ,निवृत्त झाल्यावर 120 रुपयात प्राथमिक उपचार आदी सवलती मिळतात तर अटल विनीत व्यक्ती कल्याण योजना अंतर्गत कंपनी बंद पडली,दिवाळखोरीत निघाली किंवा नौकरी गेली असल्यास 3 महिन्याचा पगार देण्याची तरदूत असून सदर योजना जून 2021 पर्यंत आहे.
बारामती मध्ये 'ई एस आय' हॉस्पिटल व्हावे : एमआयडीसी कामगारांची मागणी
जळोची: फलटण टुडे वृत्तसेवा
बारामती एमआयडीसी मधील विविध कंपन्यांच्या कामगारांसाठी ‘ई एस आय’ (कामगार राज्य विमा महामंडळ) हॉस्पिटल होणे गरजेचे आहे त्या साठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडे पाठपुरावा करणार असल्याचे विविध कंपन्यांचे कामगार नेत्यांनी सांगितले.
बारामती एमआयडीसी मधील कंपन्यांची 3.25% रक्कम व कामगारांच्या पगारातील .75% रक्कम शासकीय नियमानुसार ई एस आय’ हॉस्पिटल साठी रक्कम दर महिन्याला कट केली जाते. ज्या कामगारांचे मासिक वेतन 21000 रुपये च्या आत आहे अशा कामगारांचे वेतन मधून सदर रक्कम दर महिन्याला कट केली जाते.बारामती एमआयडीसी मध्ये 10 हजार कामगार संख्या आहे.
परंतु वैदकीय सेवा देताना बारामती मधील कोणतेच हॉस्पिटल सेवा देत नाही कारण शासनाचे बिल वेळेवर दिले जात नाही व तांत्रिक अडचणी खूप असतात म्हणून बारामती मध्ये कोणतेच हॉस्पिटल एमआयडीसी मधील कामगारांना वैदकीय सेवा देत नाही त्यामुळे नाईलाजस्तव बिबवेवाडी पुणे येथील ई एस आय’ हॉस्पिटल मध्ये कामगार किंवा त्यांच्या कुटूंबियांना दाखल करावे लागते.
त्यामुळे अनेक कामगार पुण्याला जाण्याचा त्रास नको म्हणून नाइलजस्तव स्वखर्चाने बारामती शहरातील हॉस्पिटल मधील प्राथमिक किंवा अतिदक्षता विभागातील वैद्यकीय सेवा घेतात.
एकीकडे कंपनी कामगारांच्या पगारातून .75% रक्कम वजा करते व कामगारांना वैदकीय सेवा मिळत नाही त्यामुळे कामगारांच्या रोशास कंपनी प्रशासनाला बळी पडावे लागते.
बारामती मध्ये जर हॉस्पिटल झाले तर बारामती सह
टेंभूर्नि, फलटण,लोणंद,इंदापूर,माळशिरस आदी तालुक्यातील कामगारांना हॉस्पिटल चा फायदा होईल वेळ व पैसा वाचणार आहे. बारामती मध्ये हॉस्पिटल नसल्याने कामगार भरडला जातो तर कंपनी प्रशासना बरोबर रक्कम कट होती म्हणून मोठ्या प्रमाणात वारंवार भांडणे होतात.हॉस्पिटल मध्ये उपचार साठी जेवढे दिवस कामगार ऍडमिट असतो तेवढे दिवस पगार देण्याची तरदूत आहे परंतु पुणे मध्ये ऍडमिट झाल्यास बारामती विभागातील हॉस्पिटल मध्ये ऍडमिट झाला नाही म्हणून कामगारांना त्या दिवसातील पगार दिला जात नाही त्यामुळे कामगारांना आर्थिक व मानसिक फटका बसतो.
केवळ हॉस्पिटल नसल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक तोटा होत असल्याने
लवकरात लवकर हॉस्पिटल होणे साठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडे पाठपुरावा करणार असल्याचे एमआयडीसी मधील विविध कामगार नेत्यांनी सांगितले.