शिक्षण सेवक यांची समुपदेशन प्रक्रिया पूर्ण


                 सातारा, दि. 10 (जिमाका) : शिक्षण विभागाच्या जिल्हा परिषद, सातारा अंतर्गत सन 2020-21 वर्षामध्ये आंतरजिल्हा बदली ने हजर व अुनसूचित जमाती विशेष भरती मोहिम हजर झालेले शिक्षण सेवक यांची समुपदेशन प्रक्रिया राबविण्यात आली असल्याची माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद, सातारा यांनी दिली.
मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा,  जिल्हा परिषद, सातारा यांनी दिलेल्या निर्देशानुसार शिक्षकाची सेवा ज्येष्ठता लावण्यात आली असून त्याच्या हरकती विचारात घेवून व शासन निर्देशानुसार महिला शिक्षकांना प्राध्यान्य देवून सेवाज्येष्ठता यादी तयार करुन समुपदेशनाने पदस्थापना प्रक्रिया करण्यात आली.  
सदरच्या बदलीने पदस्थापना अध्यक्ष उदय कबुले, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य)  मनोज जाधव, सभापती, शिक्षण, अर्थ व क्रिडा मानसिंगराव जगदाळे, सभापती कृषी व पशुसंवर्धन समिती मंगेश धुमाळ, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्रीमती प्रभावती कोळेकर, सर्व तालुक्यांचे गटशिक्षणाधिकारी, पदाधिकारी व अधिकारी यांचे उपस्थितीत समुपदेशनाने पार पाडण्यात आलेल्या आहेत.
ही पदस्थापना प्रक्रिया अत्यंत पारदर्शी झाल्याबाबतच्या प्रतिक्रिया सर्व अंतरजिल्हा बदलीने हजर झालेल्या शिक्षकांनी व्यक्त केल्याची माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक), सातारा जिल्हा परिषद, सातारा यांनी दिली.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!