श्री सन्मती सेवा दल (पश्चिम महाराष्ट्र)
फलटण : श्री भारतवर्षीय दिगंबर जैन तीर्थक्षेत्र कमिटी, श्री भारतवर्षीय दिगंबर जैन महासभा आणि
फेडरेशन ऑफ हुमड जैन समाज यांनी सलग १० वर्ष शिखर संस्थेच्या सहकार्याने आयोजीत केली जाते
प्रति वर्षीय श्री सम्मेद शिखरजी तीर्थयात्रा आणि तीर्थक्षेत्र पहाडी स्वच्छता अभियान दि.०१ फेब्रुवारी २०२१ ते १० फेब्रुवारी २०२१ असे आयोजित केले गेले होते
यावेळी जैन समाजातील युवकांची सहा जिल्ह्यांची प्राथमिक संघटना असलेल्या सन्मती सेवा दलाच्यावतीने जैन धर्मियांचे तिर्थक्षेत्र असलेल्या शिखरजी(झारखंड) येथील पार्श्वनाथ पहाडावर स्वच्छता अभियान राबविले. सन्मती सेवा दलाचे स्वच्छता अभियानाचे हे दहावे वर्ष आहे. या वर्षी या अभियानासाठी ३५ स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. सन २०१२ पासून दर वर्षी हे अभियान राबवले जाते. आज पर्यंत या मध्ये सुमारे ११०० तरुणांनी शिखरजी पहाड स्वच्छता केली आहे.
या अभियानासाठी मागील तीन वर्षांपूर्वी गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने संघटनेचा सन्मान केला आहे. जाने.किंवा फेब्रुवारी.या कालावधीत शिखरजी अभियान असून यामध्ये वंदना, स्वच्छता, पर्यटन चा सहभाग आहे. सेवा दलाचे संस्थापक मिहीर गांधी, मा.अध्यक्ष मयुर गांधी, वीरकुमार दोशी, महावीर दोशी, नमन गांधी, हितेश दोशी, पंकज दोशी, राजेश दोशी *आयोजक संदेश गांधी* यांच्यासह ३५ स्वयंसेवक या अभियानात कार्यरत आहेत. असे काम सलग १० वर्ष संस्थेच्या माध्यमातून केले जाते.