सातारा दि.6 (जिमाका): कोरोना प्रतिबंधक लस देण्याच्या मोहिमेला जिल्ह्यात 16 जोनवारी पासून सुरुवात करण्यात आली होती. पहिल्या टप्प्यात शासकीय व खासगी आरोग्य संस्था अंतर्गत कर्मचारी, दुसऱ्या टप्प्यात पोलीस विभाग, सैन्य दल, हवाई दल व तिसऱ्या टप्प्यात सर्व सामान्य नागरिकांना लस देण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा व पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी कोरोना प्रतिबंधक लस येथील स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधरण रुग्णालयात घेतली.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये आदी उपस्थित होते.
मी कोरोना प्रतिबंधक लस घेतीली आहे. या लसीचा मला कोणाताही त्रास झालेला नाही. ही लस संपूर्णपणे सुरक्षीत असून या लसीबाबत गैरसमज न बाळगता जास्तीत जास्त नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी यावेळी केले.