सातारा दि. 29 (जिमाका) : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ज्या महिला व संस्थांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी मौलिक कार्य केले आहे अशा महिला व संस्थांच्या सन्मानार्थ केंद्र शासनाकडून नारी शक्ती पुरस्कार देण्यात येणार आहे. प्रशस्तीपत्र व रु. 2 लाख असे पुरस्काराचे स्वरुप आहे. महिला सक्षमीकरणासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना सदरचा पुरस्कार देण्यात येणार आहे.
हा पुरस्कार वैयक्तिक व संस्थेसाठी अशा दोघांसाठी आहे. वैयक्तिक पुरस्कारासाठी महिलेचे वय किमान 1.7.2020 रोजी 25 वर्षे पूर्ण असावे. संस्थेसाठी अर्ज करण्यास संस्था किमान पाच वर्ष या क्षेत्रात कार्यरत असावी. ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी अर्जदारास हा पुरस्कार प्रापत नसावा. पात्र व इच्छुकांनी विहीत नमुन्यातील अर्ज ऑनलाईन पध्दतीने www.narishaktipurskar.wcd.gov.