वसुंधरा वाहिनी वरून' फॅक्टशाळा' चे प्रसारण

 

फॅक्टशाळा उपक्रम सादर करताना वसुंधरा वाहिनी ची टीम
जळोची: फलटण टुडे वृत्तसेवा 
विद्या प्रतिष्ठानच्या वसुंधरा वाहिनीवरून सोशल मिडीयाच्या माध्यमातून पसरणाऱ्या फेक न्यूज बद्दल लोकांच्या मध्ये जाणीव जागृतीपर ‘फॅक्टशाळा’ या कार्यक्रमांची मालिका प्रसारित करण्यात आली.
सध्या इंटरनेटचा वाढता वापर आणि त्या अनुषंगाने सोशल मिडीयावरून व्हायरल होणाऱ्या बातम्या आणि व्हिडीओ यामुळे काही खोट्या बातम्या, अफवा पसरून त्याचे दुष्परिणाम होऊ नयेत, समाजाला खऱ्या खोट्या बातम्यांमधील फरक ओळखता यावा यावर आधारीत ‘फॅक्टशाळा’ या कार्यक्रमांची मालिका वसुंधरा वाहिनीवरून प्रसारित करण्यात आली. यामध्ये बातम्यांचे पारंपारिक आणि अपारंपरिक स्त्रोत, बातम्यांची सत्यता कशी पहायची, याविषयी माहितीपर कार्यक्रम प्रसारित करण्यात आले.  या कार्यक्रमात महास्पोर्टचे को फौंडर श्री शरद बोदगे, न्यूज १८ लोकमत चे वरिष्ठ संपादक श्री महेश म्हात्रे, पुढारीचे पत्रकार श्री अनिल सावळे पाटील, भोंगा डॉट कॉम चे फॅक्टचेकर श्री दिगंबर दगडे या अनुभवी पत्रकारांचे अनुभव यासाठी घेतले.  
वसुंधरा वाहिनी व विद्याप्र्तीष्ठान मराठी माध्यमिक हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षकांसाठी बनावट व खोट्या बातम्या कशा ओळखायच्या या विषयी कार्यशाळा घेण्यात आली. सोशल मिडीयाच्या वाढत जाणारा वापर, फेक न्यूजमुळे होणारे दुष्परिणाम या विषयी नगर परिषद बारामती, पंचायत समिती बारामती, अंगणवाडी सेविका तसेच काही सोसायट्यांमध्ये जाऊन फॅक्टशाळा – फॅक्टचेक या कार्यशाळा घेऊन जनजागृती करण्यात आली कोणत्याही बातमी आपल्याला आली कि प्रथम त्याची सत्यता पडताळून पाहून मगच ती फॉरवर्ड करावी अन्यथा डिलीट करावी असे सांगण्यात आले. वसुंधरा वाहिनीच्या आर जे फॅक्टशाळाचे ट्रेनर ऋतुजा आगम यांनी ट्रेनिंग दिले. आर.जे. स्नेहल कदम यांनी ध्वनीमुद्रण केले, जर्नालिझम च्या विद्यार्थिनी  सुब्बलक्ष्मी वाघ, स्वराली शहा यांनी परिश्रम घेतले. 
या कार्यशाळेसाठी ओमकारेश्वर महिलाबचतगट, माळेगाव  अंगाणवाडी पर्यवेक्षिका शुभदा भिलारे, विद्याप्र्तीष्ठान मराठी मिडीयम स्कूल चे प्राचार्य श्री शिंदे, नगर परिषद बारामतीचे उद्यान,  आरोग्य, सफाई कर्मचारी आरोग्यनिरीक्षक राजेंद्र सोनवणे, पंचायत समिती बारामतीचे गट विकास अधिकारी राहुल काळभोर, सभापती निताताई बारवकर, उपसभापती प्रदीप बापू धापटे, पंचायत समिती सदस्य रोहितभैय्या कोकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
अशा प्रकारे खोट्या बातम्याच्या प्रसार रोखण्यासाठी पंचायत, शिक्षक अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून असंख्य लोकांना बातमीची सत्यता पडताळण्या विषयी जाणीव जागृती वसुंधरा वाहिनीने घेतलेल्या कार्यशाळामुळे केली असल्याचे वसुंधरा वाहिनीच्या केंद्र प्रमुख सौ.आशा नारायण मोरे यांनी सांगितले.
विद्याप्रतिष्ठानच्या विश्वस्त सौ. सुनेत्रा अजित पवार, सचिव अॅडव्होकेट नीलिमाताई गुजर, व्ही.आय.आय.टी. चे संचालक श्री सतीशचंद्र जोशी यांनी कार्यक्रमासाठी प्रोत्साहन दिले.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!