जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने बालिका दिन व मतदार दिन कार्यक्रम संपन्न

            सातारा दि.21 (जिमाका): जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, निर्माण बहुउद्देशीय विकास संस्था आणि यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ सोशल वर्क, जकातवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आज श्री कोटेश्वर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय, गोवे येथे बालिका दिन व मतदार दिन साजरा करण्यात आला.

            या कार्यक्रमास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तृप्ती जाधव, पोलीस उपअधीक्षक राजेंद्र साळुंखे, प्रा. जीवन बोराटे, शिवाजी राऊत, काजल गायकवाड यांच्यासह विद्यार्थी, विद्यार्थींनी उपस्थित होते.

            या प्रसंगी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तृप्ती जाधव यांनी प्राधिकरणाच्या माध्यमातून बालिका व महिलांना कोणत्या प्रकारचे लाभ मिळतात या विषयी सविस्तर माहिती दिली. तर पोलीस उपअधीक्षक राजेंद्र साळुंखे यांनी मतदार दिनाचे महत्व, शिवाजी राऊत यांनी बालिका दिनाचे महत्व यावेळी सांगितले.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!