बारामती ( फलटण टुडे वृत्तसेवा ) :
महाविद्यालयाने मागील दोन वर्षां मध्ये ५६० हुन अधिक विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंटद्वारे नोकरी उपलब्ध करून दिली होती आणि तीच परंपरा २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात सुरु ठेवली आहे.
*टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस* (टीसीएस) या नामांकित बहुराष्ट्रीय आईटी कंपनी ने नुकत्याच घेतलेल्या नॅशनल क्वालीफायर टेस्ट २०२१ व इंटरव्यु प्रोसेसमध्ये महाविद्यालयातील अंतिमवर्ष अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी उत्कृष्ठ कामगिरी करून यश संपादन केले आहे, १८ विद्यार्थ्यांची टीसीएस मध्ये नोकरीसाठी निवड झाली आहे. या १८ विद्यार्थ्यांना ३ लाख ३६ हजार रुपये वार्षिक पगाराचे पॅकेज देण्यात आले आहे. टीसीएस ने निवड प्रक्रियेमध्ये ऑनलाईन ऍप्टिट्यूड टेस्ट, प्रोग्रामिंग राऊंड, टेक्निकल इंटरव्यू, आणि एचआर इंटरव्यू हे राऊंड घेतले.
टीसीएस मध्ये नोकरीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढील प्रमाणे:
*इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलेकॉम्म्युनिकेशन्स (इ अँड टीसी) इंजिनीअरिंग विभाग:* चैतन्य साबळे आणि निर्मल कुंभार. *इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग विभाग:* श्याम डांगे, प्रणोती गोवेकर आणि स्वप्नील राजेवार. *कॉम्पुटर इंजिनीअरिंग विभाग:* दीप्ती गांधी, किरण बिराजदार, कोमल जाधव, ऋचा महामुनी, स्वप्नील जगदाळे, विशाल बनकर, अनिकेत गोटूरे आणि शिवानी घोलप. *इन्फॉरमेशन टेकनॉलॉजि इंजिनीअरिंग विभाग:* चैतन्य शिंदे, मोनिका कळसकर, साहिल बोराटे, यश कदम, अक्षता गवळी.
कॅम्पस इंटरव्ह्यू मधून नोकरीची संधी मिळावी म्हणून महाविद्यालय सतत प्रयत्न करते. याचाच भाग म्हणून महाविद्यालयतर्फे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध टेक्निकल, स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग प्रोग्रॅम्स आयोजित केले जातात, हे ट्रेनिंग प्रोग्रॅम्स घेण्यासाठी कॉलेजमधील तज्ज्ञ शिक्षक आणि इंडस्ट्रीमधील तज्ज्ञांची मदत घेतली जाते.
महाविद्यालयाच्या ट्रेनिंग आणि प्लेसमेंट टीम ने टीसीएस च्या निवड प्रक्रिये दरम्यान विशेष परिश्रम घेतले, प्रा. अनिल पाटील, प्रा. निलेश पांढरे, प्रा. व्यंकटेश रामपूरकर आणि प्रा. संतोष करे यांनी विद्यार्थ्यांना इंग्लिश कम्युनिकेशन, सी प्रोग्रामिंग आणि इंटरव्यू टेक्निक इत्यादी विषयांवर मार्गदर्शन केले याचा फायदा विद्यार्थ्यांना टीसीएस च्या निवड प्रक्रिये दरम्यान झाला तसेच सर्व हेड ऑफ डिपार्टमेंट्सनी टीसीएस ची नॅशनल क्वालिफायर टेस्ट जास्तीत जास्त विद्यार्थीनी द्यावी यासाठी विशेष प्रयत्न केले अशी माहिती ट्रेनिंग आणि प्लेसमेंट ऑफिसर प्रा. विशाल कोरे यांनी दिली.
विद्यार्थ्यांच्या या उत्तुंग यशाबद्दल विद्या प्रतिष्ठान संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. अशोक प्रभुणे, विश्वस्त सौ. सुनेत्राताई पवार, सचिव अॅड. निलीमाताई गुजर आणि मॅनेजमेंट कौन्सिलचे मेंबर्स, पालक, संस्थेतील सर्व कर्मचारी व समाजातील इतर नागरिकांकडून कौतुक व अभिनंदन होत आहे.
चालू शैक्षणिक वर्षात जास्तीत जास्त कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी, भरपूर रोजगाराच्या संधी उपलब्द्ध करण्यासाठी आणि १०० टक्के विद्यार्थ्यांना नोकरी मिळावी यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार असल्याची ग्वाही महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. आर एस बिचकर यांनी दिली आहे.