बारामतीच्या तांबेनगर मधील रहिवासी व खडकी ता.दौंड शाळेतील उपक्रमशील शिक्षिका विद्या लक्ष्मण जगताप यांनी मकरसंक्रातीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या हळदी कुंकू कार्यक्रमात पुस्तकरुपी विचारांचे वाण लुटून एक अभिनव असा उपक्रम राबविला.
जानेवारी महिन्यात सावित्रीबाई फुले , राजमाता जिजाऊ यांची जयंती तसेच मकरसंक्रांत हा सण असतो.मकरसंक्रांतीला माहिला हळदी कुंकू कार्यक्रम करतात.महिलांना घरी बोलावून विविध वस्तूंचे वाण लुटतात.
परंतु विद्या जगताप यांनी जिजाऊ सावित्री यांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी समाजसुधारक ,थोर क्रांतिकारक तसेच देशभक्त यांच्या कार्याचा परिचय व्हावा आणि सोशल मिडिया व मोबाईलच्या जमान्यात वाचन संस्कृती जोपासली जावी याकरिता वाण म्हणून चरिञात्मक पुस्तकांचे वाण लुटले.यावेळी उपस्थित महिलांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.आणि त्यांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जाण्याचा संकल्प केला.
कार्यक्रमासाठी सारीका जाधव,कौशल्या वणवे,मनिषा तावरे,कवयिञी विद्या जाधव,सुनिता बोरावके,प्रीती गाढवे,मानसी सुभेदार,ज्योती पिसे,वर्षा मोहिते,कविता भापकर,रूपाली गायकवाड,शरयू कुमठेकर,माधुरी वाघमारे,नंदा मेंगावडे,नलिनी सुभेदार,नंदा तावरे,सोनाली मरळे,सीमा पवार,मंगल बरमे,योगिता रकटे,पूजा भारती,सुवर्णा चांदगुडे इ.महिला उपस्थित होत्या.