फलटण -राज्य परिवहन महामंडळ (एस.टी.) फलटण आगारात ईधन बचत मासिक कार्यक्रमाचे आज पुणे विभागाचे ऊप प्रादेशीक परीवहन अधिकारी संभाजीराव गावडे यांचे शुभहस्ते दिप प्रज्वलीत करुन व श्रीफळ वाढवुन ऊदघाटन करण्यात आले,यावेळी गावडे बोलत होते.
प्रतीवर्षी राज्य परिवहन महामंडळ इंधन बचत मासिक कार्यक्रम राबवत असते.फलटण आगारात उप प्रादेशीक परिवहन अधिकारी संभाजीराव गावडे यांचे अध्यक्षतेखाली इंधन बचत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.दि.१६/१/२१ते १५/२/२१ अखेर इंधन बचत मासिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन ओमकारा ड्रायव्हींग स्कुलचे सर्वेसर्वा अप्पा टेंबरे,प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष शिवलाल गावडे सर,श्री तेज मोटार ड्रायव्हीग स्कुलचे प्रमुख लक्ष्मण बुधनवर ,आगार व्यवस्थापक नंदकुमार धुमाळ,सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक राहुल कुंभार,वाहतुक निरीक्षक दत्ताञय महानवर,सहाय्यक वाहतुक निरीक्षक धिरज अहिवळे,प्रशिक्षणार्थी वाहतुक निरिक्षक सुहास कोरडे ,वरिष्ट लिपिक लहु चोरमले व बहुसंख्य चालक-वाहक-कार्यशाळा कर्मचारी उपस्थित होते.अध्यक्षपदावरुन बोलताना गावडे यांनी डिझेल बचत करुन चालकांनी देशाच्या प्रगतीला हातभार लावावा असे प्रतिपादन केले. सुरक्षित व नियंञीत वेग ठेवल्यास निश्चितच ईधन बचत होईल असे नमुद केले.
यावेळी अप्पा टेंबरे ,लक्ष्मण बुधनवर यांनी ईधन बचती बाबत विस्तुत मार्गदर्शन केले. आगार व्यवस्थापक नंदकुमार धुमाळ यांनी प्रास्ताविकात चालकांनी जास्तीत जास्त डिझेल बचत करण्याचे आवाहन केले. सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक राहुल कुंभार यांनी एस.टी.बसेस कार्यक्रमानुसार वेळेत दुरुत्या करुन,डिझेल गळती थांबवुन,टायर मधे योग्य हवा ठेवुन इंधन बचतीला हातभार लावावा असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सुञ संचालन दत्ताञय महानवर यांनी केले.आभार प्रदर्शन श्रीपाल जैन यांनी केले .