फलटण : प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लि, सातारचे शाखा व्यवस्थापक परामणे साहेब यांना सातारा जिल्हा आयडियल बहुजन टिचर्स असोसिएशनच्या वतीने बँकेच्या सर्व प्रकारच्या कर्जावरील व्याजदर एक अंकी करण्याबाबत व लाभांश १५ टक्के देण्याबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य आयडियल बहुजन टिचर्स असोसिएशनचे राज्य उपाध्यक्ष,राजेश बोराटे सर व महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष राजेश शिंगाडे सर उपस्थित होते.
प्राथमिक शिक्षक बॅकेच्या सर्व प्रकारच्या कर्जावरील व्याजदर एक अंकी करण्याबाबत व लाभांश १५ टक्के देण्याबाबतची महाराष्ट्र राज्य आयडियल बहुजन टिचर्स असोसिएशनची मागणी
सध्या देशभरासह महाराष्ट्रात कोरोना प्रादुर्भाव जास्त आहे. त्यामुळे एस. बी. आय. बँकेतही अनेक सहकारी बँकांनी व्याजदर कमी केलेले आहेत. प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लि, सातारा यांनीही सर्व प्रकारच्या विविध कर्जावरील व्याजदर कमी करून सर्व सामान्य सभासदांना लाभ देण्यात यावा आणि एक अंकी व्याजदराची दिवाळी भेट द्यावी व या वर्षी १५ टक्के लाभांश द्यावा अशी मागणी निवेदनात केली आहे.