रुई च्या विकासासाठी राष्ट्रवादी कटिबद्ध :दत्तात्रय भरणे

रुई येथे दत्तात्रय भरणे यांच्या समवेत नगरसेविका सुरेखा चौधर व रुई मधील राष्ट्रवादी चे पदाधिकारी (छाया अनिल सावळेपाटील)

बारामती: फलटण टुडे वृत्तसेवा 
 राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली  बारामती नगरपरिषद च्या वाढीव हद्दीतील रुई,जळोची,तांदुळवाडी येथील सर्व विकासकामे होतीलच त्याच प्रमाणे रुई मध्ये शरद पवार यांचे स्वप्नातील शैक्षणिक संकुल विद्या प्रतिष्ठान साकारले  व इतर नामांकित कंपन्या मुळे रुई चे  वेगळे पण सर्वत्र दिसत आहे एकूणच रुई च्या विकासासाठी राष्ट्रवादी पक्ष  कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
रुई येथील विविध विकास कामास सदिच्छा भेट देऊन  पाहणी करते वेळी दत्तात्र्य भरणे बोलत होते या वेळी जिल्हा नियोजन  सदस्य  प्रताप पाटील , नगरसेविका सुरेखा चौधर,राष्ट्रवादी चे रुई येथील पदाधिकारी पांडुरंग चौधर, पंचायत समिती चे माजी गटनेते दिपक मलगुंडे,राष्ट्रवादी चे उपाध्यक्ष बाबासाहेब चौधर ,रुई चे माजी सरपंच 
मच्छिंद्र चौधर,दादा चौधर ,अजिनाथ चौधर ,राघुशेट चौधर,विकी कांबळे 
महादेव चौधर,यशवंत चौधर,गोरख चौधर ,सुरज चौधर,नितीन पानसरे 
आबा खाडे,विशाल जगताप,लक्ष्मण चौधर,प्रशांत चौधर,हर्षद पानसरे
बारामती मधील विकास चा आदर्श घेऊन आम्ही सर्व राष्ट्रवादी मधील आमदार खासदार आप आपल्या मतदार संघात कार्य करत असतो तसेच नगरसेविका सुरेखा चौधर यांच्या रुई च्या विकासात योगदान असल्याचे दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.  उपमुख्यमंत्री आजित पवार यांच्या मार्गदर्शन खाली होत असलेली रुई मधील विविध विकास कामे याची माहिती स्थानिक नगरसेविका सुरेखा चौधर  यांनी दिली. गोरख चौधर यांनी आभार मानले.

  
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!