सातारा डाक विभागाद्वारे ‘माय स्टॅम्प’ सुविधा उपलब्ध



सातारा दि. 5 (जिमाका):   टपाल तिकीट प्रेमींना एक नामी संधी डाक विभागाने ‘माय स्टॅम्प’ च्या माध्यमातून उपलब्ध करून दिली आहे. या माध्यमातून प्रत्येकाला आपल्या स्व:ताला टपाल तिकिटावर पाहता येणार आहे.  हा एक वयक्तिक पोस्टल स्टॅम्प असणार आहे  जो की  टपाल तिकीट प्रेमींना संग्रहणीय आणि आवडत्या व्यक्तींना भेट वस्तू पाठविताना उपयोगी येणार आहे. वैयक्तीक टपाल तिकीट बनवताना टपालाच्या निवडलेल्या टेम्पलेट शीटवर स्व:ताचे  छायाचित्र आणि  संस्थांचे लोगो किंवा कलाकृती, वारसा इमारती, प्रसिद्ध पर्यटन स्थळे, ऐतिहासिक शहरे, वन्यजीव, इतर प्राणी व पक्षी इत्यादींची प्रतिमा छपाई करून वैयक्तिकृत केले जाणार आहे.

                भारतात सर्वप्रथम ‘माय स्टॅम्प’ जागतिक फिलाटेलिक प्रदर्शनात – ‘इंडिपेक्स-२०११’ मध्ये सादर करण्यात आला. ही योजना निवडक फिलाटेलिक ब्युरोक्स आणि काउंटर / पर्यटन स्थळांवर स्थित महत्वाची टपाल कार्यालये / पोस्ट कार्यालये उपलब्ध आहे.

                सातारा डाक विभागाच्या वतीने हि सेवा सुप्रसिद्ध पर्यटन स्थळ मॅप्रो गार्डन, गुरेघर-पांचगणी, सातारा या ठिकाणी श्री. मयूर वोरा, MD, मॅप्रो गार्डन व श्री. ऋषिकेश चव्हाण(मापारी), GM, मॅप्रो गार्डन  व व्यवस्थापन यांच्या सहयोगाने दि. ०५.११.२०२० पासून सुरु करण्यात आली आहे. सर्व पर्यटक यांनी स्वताचा व कुटुंबियांचा ‘माय स्टॅम्प’ बनवून आपली सहल संस्मरणीय बनवावी असे आवाहन श्रीमती अपराजिता म्रिधा (IPoS), प्रवर अधिक्षक डाकघर सातारा विभाग सातारा यांनी केले आहे.  

                यासाठी ग्राहकांना स्व:ताचा एखादा खास अथवा प्रत्यक्ष फोटो काढलेला फोटो, एक फॉर्म, आयडी प्रुफ आणि रु.३०० इ. ची पूर्तता करावी लागेल. यामधून ग्राहकांना १२ ‘माय स्टॅम्प’ च्या प्रती मिळतील. तसेच कॉर्पोरेट माय स्टॅम्प ची सुविधा उपलब्ध आहे. ज्या कंपनी आणि फर्म यांना आपले वार्षिक वर्धापन दिन, स्मृतिदिन, कंपनी  लोगोच्या माय स्टॅम्प प्रती मागणी प्रमाणे करून मिळतील, अशी माहिती श्रीमती अपराजिता म्रिधा (IPoS), प्रवर अधिक्षक डाकघर, सातारा विभाग सातारा यांनी दिली आहे. अधिक माहिती साठी सातारा डाक विभागीय कार्यालय ०२१६२-२३७४४३ / २३७४३७ या दूरध्वनी क्रमाकावर संपर्क करावा.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!