धनंजय घोरपडे यांचा अभिनंदन करताना फ.प . समिती चे सभापती मा.श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर, शिवाजीराव माने पाटील, सरपंच महादेव सकुंडे व इतर
फलटण टुडे वृत्तसेवा
आसू ता.फलटण ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी दिनांक 2 रोजी मतदान घेण्यात आले यामध्ये धनंजय देविदास घोरपडे यांना अकरा मते मिळून विजय झाला तर पराभूत उमेदवार ॲड.जीवन बापूराव पवार यांना तीन मते मिळून आठ मतांनी पराभव झाला.
आसू ग्रामपंचायतीचे उपसरपंच नितीन सोपानराव गोडसे यांचा एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्याने त्यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे आज दि. 2 नोव्हेंबर रोजी उपसरपंच पदासाठी मतदान घेण्यात आले. तर यामध्ये सत्ताधारी पक्षातर्फे धनंजय देविदास घोरपडे यांनी तर विरोधी पक्षाकडून ॲड.जीवन बापूराव पवार यांनी अर्ज दाखल केले होता. त्यानुसार निवडणूक होऊन यामध्ये धनंजय घोरपडे यांचा विजय झाला. या निवडणूक प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे गरुड यांनी काम पाहिले तर निवडणूक सहाय्यक म्हणून सरपंच महादेवराव सकुंडे व ग्रामसेवक साळुंखे यांनी काम पाहिले.
उपसरपंच पदी धनंजय देविदास घोरपडे यांची निवड झाल्या बद्दल फलटण पंचायत समितीचे सभापती श्रीमंत शिवरूपराजे निंबाळकर-खर्डेकर व धिरेंद्रराजे निंबाळकर-खर्डेकर व तसेच विशालसिंह माने-पाटील यांनी अभिनंदन केले त्याच बरोबर आसू ग्रामस्थांनी देखील उपसरपंच पदी विराजमान झालेल्या धनंजय घोरपडे यांचे अभिनंदन केले.