*
सातारा दि.26 (जिमाका) : राष्ट्रीय विकास योजना अंतर्गत सुरु करण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनेसाठी अर्ज करु इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी दि. 2 ते 19 ऑक्टोबर 2020 अखेर शासनाच्या Maha-DBT या संकेतस्थळावर ऑनलाईन किंवा समक्ष भेट देऊन विहीत नमुन्यात अर्ज सादर करावेत असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले होते.
या योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने अर्ज स्विकृतीच्या कालावधीस दहा दिवसांची मुदतवाढ देण्यात आल्याने, सुधारीत अंमलबजावणी वेळापत्रकानुसार अर्ज स्विकृतीची सुधारीत अंतिम तारीख दि. 2 नोव्हेंबर 2020 कार्यालयीन वेळेत सांय 6.15 पर्यत अशी निश्चित करण्यात आली आहे. अर्जाचा नमुना संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयात उपलब्ध आहे.
तरी सर्व इच्छुक शेतकऱ्यांनी ऑनलाईन/ऑफलाईन पध्दतीने वरील कागपत्रांसहित परीपूर्ण अर्ज संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयात दि. 2 नोव्हेंबर 2020 कार्यालीन वेळेत सायं. 6.15 पर्यंत सादर करावेत असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.