इंटरनॅशनल फेडेरेशन ऑफ योग प्रोफेशनल, महाराष्ट्र च्या अध्यक्ष पदी डॉ निलेश महाजन यांची निवड*

बारामतीच्या शिरोपेचात अजून एक मानाचा तुरा* 

 बारामती  : बारामतीतील योग महाविद्यालयाचे संचालक योगाचार्य डॉ निलेश महाजन यांची दिल्लीतील  इंटरनॅशनल फेडेरेशन ऑफ योग प्रोफेशनल (IFYP ) च्या महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष म्हणून नुकतीच निवड केली आहे, त्या संबंधीचे पत्र राष्ट्रीय अध्यक्ष श्री सदानंद यांच्यातर्फे  देण्यात आले आहे. इंटरनॅशनल फेडेरेशन ऑफ योग प्रोफेशनल हि दिल्लीतील संस्था संपूर्ण भारतामध्ये तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर योगशास्त्राच्या प्रचार व प्रसाराचे कार्य करते . विविध राष्ट्रीय ,आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांचे ,योग शिबिरांचे, स्पर्धांचे आयोजन करणे ,योग शिक्षकांना व्यावसायिक मार्गदर्शन करणे ,त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी मदत करणे  , आयुष मंत्रालयाच्या योग विषयक विविध योजनांच्या प्रसारासाठी मदत करणे असे या संस्थेचे कार्य आहे . अध्यक्ष म्हणून  निवड करताना  योगक्षेत्रातील शिक्षण , ज्ञान, प्रत्यक्ष योग शिक्षणाचा अनुभव आणि तसेच योग विषयक कारकीदिचा आढावा घेतला जातो.

    आपल्या पुणे व बारामतीच्या ग्रामीण भागामध्ये  खूप चांगले योग करणारे विद्यार्थी आहेत, परंतु केवळ योग्य मार्गदर्शन नसल्याने व त्यातील विविध संधींची माहिती नसल्यामुळे अनेकांचे योग कौशल्य वाया जाते  त्यामुळे ग्रामीण भागातील  युवकांना योग क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण देणे आणि त्यांना परदेशामध्ये योगशिक्षक म्हणून पाठवणे यासाठी प्रयत्नशील असल्याचे डॉ निलेश महाजन यांनी सांगितले.

योगाचार्य डॉ निलेश महाजन हे गेले 15 वर्षांपासून पुणे व बारामती शहर व ग्रामीण भागात  जीवनविद्या योग आयुर्वेद फौंडेशन च्या माध्यमातून योग विषयक प्रचार व प्रसाराचे प्रभावी कार्य करीत आहेत. आयुष मंत्रालयाच्या योग प्रमाणीकरण मंडळाने त्यांची तज्ज्ञ योग परीक्षक  म्हणून नुकतीच निवड केली आहे , सरकारच्या विविध योग विषयक योजना राबविण्यासाठी ते सतत कार्यरत असतात. बारामतीमध्ये नव्याने सुरू झालेल्या योग महाविद्यालयाचे ते संचालक म्हणून कार्यरत आहे. या महाविद्यालयामध्ये योग विषयामध्ये डिप्लोमा, पदवी ते पदव्युत्तर शिक्षण देण्यात येते. प्रा .श्री विजय माढेकर यांची सचिव म्हणून तर पुण्यातील डॉ विकास चोटे यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे .
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!