बारामती: उच्च रक्तदाब व मधुमेह असताना मधुकर धुमाळ वय वर्ष 85 आणि त्यांच्या पत्नी सुलोचना धुमाळ वय वर्ष 78 या दोघा पती पत्नी ने कोरोना ला हरवत विजय मिळविला आहे.
एमआयडीसी बारामती येथील व्यवसाईक प्रभाकर धुमाळ यांच्या आई वडिलां ची 5 ऑक्टोम्बर रोजी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली परंतु तरीही न घाबरता बारामती हॉस्पिटलमध्ये दाखल होऊन चौदा दिवस कोरोनावर उपचार घेत बरोबरीने मधुमेह व उच्च रक्तदाब यांच्या सुद्धा गोळ्या औषधे चालू होत्या. उपचार घेतल्या नंतर कोरोना चाचणी निगेटिव्ह आली त्यानंतर घरी आल्यानंतर सर्व कुटूंबियांनी रांगोळी काढून व फुलांची सजावट व औक्षण करून जल्लोषात स्वागत केले.घरी आल्यावर जय जवान माजी सैनिक संघटना अध्यक्ष हनुमंत निबाळकर,सचिन सावंत व स्थानिकानी सुद्धा स्वागत केले. धुमाळ कुटूंबियानी वैदकीय महाविद्यालय चे अधिष्ठाता डॉ संजयकुमार तांबे व त्यांचे सर्व सहकारी डॉक्टर,नर्स,सहायक यांचे आभार मानले.
या वयात आई वडिलांना खऱ्या अर्थाने डॉक्टर च्या प्रत्यनामुळे पुन्हा जीवदान मिळाल्याचे मुलगा प्रभाकर धुमाळ यांनी सांगितले.