वीर सावरकर जलतरण तलाव जवळील रस्त्यावर साठलेले पावसाचे पाणी (छाया अनिल सावळेपाटील)
बारामती:
बारामती शहरातील देवीच्या मंदिर कडे जाणारा रस्ता वीर सावरकर जलतरण तलाव समोरील रस्त्यावर अद्याप पावसाचे पाणी साचल्याने पायी चालणारे व दुचाकी व चार चाकी घेऊन जाणाऱ्यास प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
प्रशासन मात्र या कडे दुर्लक्ष करत आहेत. सकाळी व सांयकाळी याच रस्त्यावर व्यायाम करण्यासाठी व चालण्यासाठी अनेक नागरिक असतात विशेषतः ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात असतात . बारामती मधील कऱ्हा नदी मधील पूर ओसरला ज्या ठिकाणी पाणी साठून रस्ता वापरता येत नाहीत त्या ठिकानीं पाणी अडत असेल त्या ठिकाणी बांधकामे प्रशासनांनी त्वरित पाडली परंतु गेल्या 4 दिवसा पासून या रस्त्यावर पाणी साचून आहे नागरिकांना जाता येत नाही तर शेजारील सदनिका मधील रहिवाशांना डास, किडे, विंचू आदी चा प्रचंड त्रास होत आहे.तरी लवकरात लवकर सदर पावसाचे पाणी काढून टाकावे अशी मागणी नागरिक करीत आहेत.