सातारा दि. 16 (जिमाका): माण तालुक्यातील देवापुर येथील सुनिल सोपान बाबर हे दि. 15 ऑक्टोबर रोजी मुसळधार वृष्टीमुळे ओढ्याला आलेल्या पुरात वाहुन मृत झाले. शासनाच्या नियमानुसार त्यांच्या पत्नी सिंधुबाई सुनील बाबर यांना आज चार लाख रुपयांचा मदतीचा धानादेश प्रशासनाकडून देण्यात आला.
हवामान खात्याकडून पुढील दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असल्याने, विशेषत: नदी, ओढयाच्या काठच्या नागरिकांनी पाण्यात उतरु नये अथवा आपली जनावरे पाण्यात घेऊन जावू नयेत. नदीकाठच्या लोकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.