धुळदेव : फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक हमाल, मापाडी प्रतिनिधी बापू हरी करे, धुळदेव (वय 70) यांचे आज दुपारी 2.15 वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.
मार्केट यार्ड फलटण येथील माथाडी कामगारांच्या प्रश्नाबाबत पुढाकार घेऊन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर (बाबा), चेअरमन यांच्या कल्पक दृष्टिकोनातून आणि कामगार नेते मा.मानसिंगराव भगत यांच्या विचारांच्या प्रेरणेतून श्रमिकांसाठी श्रमजीवी योजना राबविली.
त्यांचे निधनाने बाजार समितीचे, कष्टकरी कामगारांचे कधीही भरुन न निघणारे नुकसान झाले आहे. त्यांचे कुटूंबियांचे दुःखात या बाजार समितीचे चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक मंडळ, स्टाफ,अडते,खरेदीदार,हमाल, मापाडी व इतर सर्व घटक सहभागी आहेत. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो ही प्रार्थना.