फलटण : फलटण पासून ७ किमी. असलेले निरा नदी काठी वसलेले कांबळेश्वर येथील तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र भिवाई देवी, मंदिर कांबळेश्वर ता.फलटण जि. सातारा या देवीला संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक येत असतात,तसेच कर्नाटक,आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश या राज्यातील लोकांचे सुद्धा ही देवी श्रद्धास्थान आहे.
सध्या अवकाळी पाऊस सगळीकडेच चालू असल्याने वीर धरणावर असलेली निरा नदीला कधी पाणी येईल सांगता येत नाही.असे चित्र असतानाच एक शेंडगे सांगोल्याचे भाविक देवीच्या दर्शनासाठी आलेले दर्शन घेऊन झाले,अंधार पडलेला उशीर पण झालेला,त्यावेळी पाणी पण जास्त प्रमाणात नदीमध्ये नव्हते म्हणून रात्री मुक्काम मंदिरामध्येच करायचा आणि सकाळी निघायचं अस ठरलेलं पण वेगळच काही तरी झालं,शेंडगे काका झोपलेले अचानक जाग आली पाहतो,तर काय सगळीकडे पाणीच पाणी अशी परिस्थिती असताना देखील शेंडगे काका,भक्त निवास मंडपमध्ये पाण्यातून वाट काढत काढत आले.रात्रभर पडत्या पावसात आणि नदीच्या महापुरात अडकले.काय करावं समजत नव्हतं,कुठे एवढ्या मोठ्या पाण्यात निघण्याचा पर्याय पण नव्हता.घरी कोणाला फोन करावा तर फोन,कपड्याची बॅग सगळं पाण्यामध्ये वाहून गेलेलं.कोणाशीच काही संपर्क होत नव्हता, मग रात्रभर एकाच ठिकाणी अवघडून गेल्यामुळे शेंडगे यांनी भर नदीच्या पाण्यामध्ये उडी मारली व पलीकडे जाऊन बाहेर पडण्यासाठी मार्ग शोधू लागले पण झाडांमुळे मार्ग काय उपलब्ध होत नव्हता,मग तेथील एक झाडाच्या फांदीला लटकून राहिले, तेवढ्यात सकाळी गावातील ग्रामस्थ मंडळी पूर पाहण्यासाठी गेली असताना, त्यांना पाण्यामध्ये कोण तरी अडकलेलं दिसलं.त्यावेळी गावातील ग्रामस्थांनी पोलीस पाटील व प्रशासनास कळविले ,लगेचच त्या क्षणी फलटणचे पोलीस निरीक्षक, तहसीलदार,सर्कल,तलाठी पोलीस पाटील सगळे घटनास्थळी दाखल झाले. तेथील परिस्थितीचा आढावा घेऊन.महाबळेश्वरचे सह्याद्री ट्रेकर्सच्या मदतीने बचाव कार्यास यश आले.
सगळे Opration Success झाल्यानंतर सर्व टीम (अभिषेक भिसे )माझ्या कांबळेश्वर येथील घरी आली.नंतर शेंडगे काकांना चहा,नाश्ता व कपडे दिली.ही देवी जागृत देवस्थान असून नवसाला पावणारी आहे.या देवीमुळेच सलग मी आज दोनदा पाण्यातून वाचलो.आणि गावातील लोकांनी व प्रशासनाने मला मदत केली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे असे ते जाताना म्हणाले नंतर शेंडगे काका त्यांच्या घरी रवाना झाले.