फलटण : फलटण शहरातील बाणगंगा नदी शेजारील शनिनगर, गणेशनगर (मलठण), पठाणवाडा येथील अतिवृष्टीमुळे प्रभावित झालेल्या भागास महाराष्ट्र विधानपरिषद सभापती मा.ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराजसाहेब), मा.आ.दिपकराव चव्हाण साहेब, मा.श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर (बाबा), मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांच्या मार्गदर्शनाखाली मा.नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक श्री.पांडुरंग गुंजवटे, आरोग्य सभापती सौ.दिपालीताई शैलेश निंबाळकर, नगरसेवक श्री.किशोरसिंह नाईक निंबाळकर, नगरसेविका सौ.प्रगती जगन्नाथ (भाऊ) कापसे, श्री.महादेव माने, श्री.राहुलभैया निंबाळकर यांनी भेट दिली. यावेळी नगर परिषद मुख्याधिकारी श्री.प्रसाद काटकर, श्री.पंढरीनाथ साठे, श्री.अजिंक्य पाटील, श्री.गणेश काकडे उपस्थित होते. फलटण नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने पुरग्रस्त भागात वास्तव्यास असणाऱ्या सर्व नागरिकांना शंकर मार्केट, फलटण येथील व्यंकटेश विद्यालय (फलटण नगरपरिषदेच्या रुग्णालया शेजारी) येथे सुरक्षित स्थळी प्रशासनाच्या वतीने राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. नदीवरील नुकसान झालेल्या तिन्ही पुलाची पाहणी करुन दुरुस्ती करण्याचे आदेश मुख्याधिकारी यांनी बांधकाम विभागास दिले. लोकप्रतिनिधी व अधिकारी यांनी बाधित कुटुंबियांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना आधार दिला, अतिवृष्टीमुळे प्रभावित झालेल्या भागातील पंचनामे तात्काळ करण्याच्या सूचना देण्यात येऊन प्रत्यक्षात पंचनामे करण्याचे काम सुरु करण्यात आले. प्रभावित भागातील रस्त्यावर चिखलाचा खच झाला होता ते रस्ते फायर ब्रिगेडची गाडी बोलावून साफ करण्याचे काम सुरु करण्यात आले. आरोग्य कर्मचाऱ्यांनी पुरात वाहून आलेली झाडे झुडपी काढण्याचे काम वेगाने सुरु केले आहे. प्रभावित क्षेत्रातील नागरिकांनी वरीलप्रमाणे तात्काळ कार्यवाही होत असल्याने समाधान व्यक्त केले.