जिल्हा कोविड हॉस्पीटल आजपासून सुरु, 18 रुग्ण दाखल

सातारा दि. 12 (जिमाका): छत्रपती शिवाजी महराज संग्रहालयात उभारण्यात आलेले  कोविड हॉस्पीटल आज पासून सुरु झाले असून आज पहिल्या दिवशी 18 रुग्ण दाखल झाले आहेत. यामध्ये 14 रुग्ण ऑक्सीजन बेडवर तर 4 रुग्ण आयसीयु बेड उपचार घेत आहेत.
जिल्ह्याच्या ठिकाणी कोविड हॉस्पीटल असावे अशी सर्वांची इच्छा होती. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील  व गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभुराज देसाई यांच्या प्रयत्नातून हे जिल्हा कोविड हॉस्पीटलची उभारणी जलदगतीने झाली. या हॉस्पीटलचे उद्घाटन 9 ऑक्टोंबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. हे हॉस्पीटल आज पासून रुग्णांच्या सेवेसाठी सुरु झाले आहे.
या हॉस्पीटलमध्ये 234 ऑक्सीजन बेड व 52 आयसीयु बेड आहेत. डायलिसीस असणाऱ्या रुग्णांना रुग्णालये घेत नाहीत अशा रुग्णांसाठीही 4 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. 

    या जिल्हा कोविड हॉस्पीटलमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या उपचाराची माहिती जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण अधिकारी या संस्थेत दुपारी 4 ते सायंकाळी 6 या वेळेत नातेवाईकांना देण्यात येणार आहे. येणाऱ्या नातेवाईकांसाठी या ठिकाणी तात्पुरते थांबण्याची  सोय सुविधा  करण्यात आलेली आहे.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!