सातारा दि.8 (जिमाका) : सातारा डाकघर यांच्यामार्फत डाक सप्ताहाच्या (दि. 9 ते 15 ऑक्टोबर) निमित्ताने लेखन व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
लेखन स्पेर्धेसाठी जवळच्या पोस्ट ऑफिसमधून पोस्ट कार्ड किंवा प्रतियोगिता पोस्ट कार्ड खरेदी करावे. या स्पर्धेसाठी विषय (कोविड-19 च्या काळात मी केलेली सर्वात महात्वाची गोष्ट) असा आहे. किमान 50 शब्दांची मार्यादा आणि लेखन इंग्रजी, हिंदी, मराठी भाषेत करायचे आहे.
चित्रकला स्पर्धेसाठी महात्मा गांधी यांचे कोणतेही टपाल तिकीट पोस्ट कार्ड किंवा प्रतियोगिता पोस्टकार्ड यावर रंगवून पाठवावे.
या दोन्ही स्पर्धा दि. 13 ते 31 ऑक्टोबर 2020 या कालावधीत असेल. पोस्ट कार्ड किंवा प्रतियोगिता पोस्ट कार्ड पाठविण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर असे. या स्पर्धेचा निकाल 5 नोव्हेंबर 2020 रोजी घोषित करण्यात येईल. पोस्ट कार्डवर वरिष्ठ अधिक्षक डाकघर सातारा विभाग सातार 415001 हा पत्ता लिहून ते जवळच्या टपाल पेडीत टाकावे. अधिक माहितीसाठी 02162-232403, 02162-237437 किंवा जवळच्या पेास्ट ऑफिसशी संपर्क साधावा, असे प्रवर डाक अधिक्षक सातारा विभाग सातारा यांनी कळविले आहे.