बारामती: राज्यात येणाऱ्या नवरात्र उत्सव मध्ये मध्य प्रदेश राज्या प्रमाणे महाराष्ट्र मध्ये सुद्धा दुर्गा देवी मूर्ती उंची वरील निर्बंध हटवण्यासाठी राज्यातील कुंभार समाज व संघटना आग्रही झाल्या आहेत.
राज्यात गणेश ऊत्सवा बरोबरच नवरात्री मध्ये दुर्गा माता ऊत्सव मोठ्या धार्मिक भावनेने साजरा केला जातो.विषेशता विदर्भमध्ये हा उत्सव मोठ्या मुर्तींची स्थापना करुन साजरा केला जातो . दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे मुर्तिकारा़नी या वर्षी साठीही दिवाळीपासूनच मोठमोठ्या मूर्ति बनवून ठेवलेल्या आहेत . या ऊत्सवामध्ये गणेश ऊत्सवा सारखी गर्दी होत नाही .याचा विचार करून तशेच मुर्तिकारांकडे शासनाचा मूर्तिबंदीचा निर्णय होणे अगोदरच तयार झालेल्या मोठ्या मूर्तिंचा ज्या पीओपी बंदीमुळे पुढील वर्षी वापरता येणार नाहीत व मूर्तिकारांगिरांचे करोडो रुपयांचे नुकसान होणार आहे ते टाळणे साठी मध्य प्रदेश सरकारने दुर्गामाता मूर्ति वरची ऊंची बंदी पुर्णपणे हटविलेली आहे .आपल्या राज्यातही मध्यम प्रदेश सरकारने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे मूर्ति ऊंची बंदी हटवून मूर्तिकार बांधवा़चे होणारे करोडो रुपयाचे आर्थिक नुकसान टाळावे , अचानकपणे करोनामुळे गणेश मूर्ति उंची वर बंदी आणलेने मुर्तिकार बांधवाकडे तयार झालेल्या अंदाजे ७००कोटी रुपयाच्या मूर्ति पडून आहेत व याही त्यांना पुढील वर्षी पीओपी बंदीमुळे कधीही विकता येणार नाहीत.मूर्तिकार बांधवांचा पुर्ण प्रपंच हा मूर्ति बनवून विकणेवर चालत असतो. हा व्यवसायास मुख्यता खाजगी कर्ज घेऊन चालविला जातो .त्यामुळे राज्यातील मुर्तिकार फार मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत शिल्लक असलेल्या मूर्तिंचा तहसिलदारांकडून पंचनामे झाले परंतु अद्याप नुकसानभरपाई मिळाली नाही.
राज्यात असलेल्या ४०००० पेक्षा जास्त गरीब मूर्ति कलाकारांना न्याय द्यावा अशी मागणी आखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास सस्था व माती कला विकास संस्थेचे राष्ट्रीय चेअरमन दत्ता कुंभार यांनी मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री यांच्या कडे निवेदन च्या माध्यमातून केली आहे.