सातारा दि.8 (जिमाका): माझे कुटुंब माजी जबाबदारी या मोहिमेंतर्गत 5 लाख 24 हजार 508 कुटुंबांतील 24 लाख 19 हजार 251 जाणांची तपासणी करण्यात आली आहे.
यामध्ये जावली तालुक्यातील 21 हजार 135 कुटुंबातील 97 हजार 832 नागरिकांची, कराड तालुक्यातील 74 हजार 323 कुटुंबातील 3 लाख 58 हजार 919 नागरिकांची, खंडाळा तालुक्यातील 34 हजार 125 कुटुंबातील 1 लाख 48 हजार 978 नागरिकांची, खटाव तालुक्यातील 62 हजार 366 कुटुंबातील 2 लाख 84 हजार 146 नागरिकांची, कोरेगाव तालुक्यातील 36 हजार 146 कुटुंबातील 1 लाख 84 हजार 231 नागरिकांची, महाबळेश्वर तालुक्यातील 14 हजार 90 कुटुंबातील 57 हजार 246 नागरिकांची, माण तालुक्यातील 39 हजार 934 कुटुंबातील 2 लाख 2 हजार 314 नागरिकांची, पाटण तालुक्यातील 48 हजार 315 कुटुंबातील 2 लाख 49 हजार 185 नागरिकांची, फलटण तालुक्यातील 67 हजार 406 कुटुंबातील 2 लाख 62 हजार 14 नागरिकांची, सातारा तालुक्यातील 94 हजार 6 कुटुंबातील 4 लाख 35 हजार 163 नागरिकांची, तर वाई तालुक्यातील 32 हजार 662 कुटुंबातील 1 लाख 39 हजार 223 नागरिकांची माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेंतर्गत आरोग्य तपासणी करण्यात आली.
तपासणी मोहिमेंतर्गत सातारा जिल्ह्यात ग्रामीण भागातील 4 लाख 56 हजार 808 कुटुंबातील 21 लाख 48 हजार 655 तर शहरी भागातील 67 हजार 900 कुटुंबातील 2 लाख 70 हजार 596 असे एकूण जिल्ह्यात आजअखेर 5 लाख 24 हजार 508 कुटुंबातील 24 लाख 19 हजार 251 नागरिकांची तपासणी करण्यात आली. या मोहिमेंतर्गत तपासणी झालेल्या लोकसंख्येपैकी 2 लाख 45 हजार 11 हे कोमॉरबिड नागरिकांची संख्या आहे. तर सारी/आयएलआय लक्षणे असलेल्या संशयित व्यक्तींची संख्या 10 हजार 97 इतकी आहे. यापैकी 7 हजार 266 व्यक्तींना संदर्भीत करण्यात आले आहे. संशयित व्यक्तींपैकी स्वॉब (आरटीपीसीआर, एन्टीजेन) टेस्ट केलेल्या 6 हजार 557 व्यक्तींपैकी 1 हजार 696 इतकी पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या आढळून आलेली आहे.