गणेशकुंज सोसायटीमधील सदनिकाधारक 3 नोव्हेंबर ला जिल्ह्याधिकारी कार्यालय सातारा येथे करणार आत्मदहन. गणेशकुंज सोसायटी शिरवळ, अनधिकृत बांधकाम प्रकरण.

सातारा  (प्रतिनिधी) :
गणेश कुंज सोसायटी गट नंबर 1319 /1 शिरवळ ता. खंडाळा जि. सातारा बाबत बिल्डर आनंद गायकवाड ,पुरुषोत्तम राठी व इतर यांनी महसूल खात्याशी भ्रष्टाचारी मार्गाने संगनमत करून बेकायदेशीर,अनधिकृत बांधकाम केले बाबत कोर्ट आदेश स्थगिती  असताना संबंधितांवर आज अखेर  कारवाई होत नाही म्हणून गणेश कुंज सोसायटीचे मुख्य प्रवर्तक संतोष मोहिते व इतर 3 नोव्हेंबर 2020 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे  दुपारी बारा वाजता आत्मदहन करणार असल्याचे निवेदन दि. 6 ऑक्टोबर 2020 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे यांना देण्यात आलेले आहे.


बिल्डर गायकवाड व राठी यांनी वेळोवेळी सुधारित  मंजूर बांधकाम आराखड्यामध्ये शासनाची व सदनिकाधारकांची वेळोवेळी फसवणूक केली आहे. याबाबत सदनिकाधारकांनी शासनाकडे वेळोवेळी तक्रारी निवेदने वस्तुनिष्ठ देऊनही त्या बिल्डरवर कारवाई होत नाही. पर्यायाने सदनिकाधारकांना न्याय मिळत नसल्याने शेवटचा पर्याय म्हणून ते आत्मदहन करत असल्याचा विचार सदनिका धारक संतोष मोहिते यांनी व्यक्त केला.

मोहिते यांनी दिलेल्या त्या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, सदर बिल्डर यांनी बेकायदेशीर बांधकाम करणे बाबत मे मॅजिस्ट्रेट वर्ग-1 खंडाळा फौजदारी खटला 24 / 2019 नुसार आदेश इशू प्रोसेस पनिशेबल 190, 199, 200, आयपीसी अगेन द पर्सन नुसार कारवाई होत नाही.

मोहिते यांनी दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की,
  सदनिका धारकांवर होणाऱ्या अन्यायाबाबत आम्ही आपले खातेस प्रचंड प्रमाणात तक्रारी केल्या. परंतु आपली महसूल यंत्रणा प्रचंड भ्रष्टाचारी असलेले बिल्डर मनसोक्त पैसे देणारे असल्यामुळे सर्वांनी संगणमत करून विषय प्रकरण दाबण्याचा आटोकाट प्रयत्न चालवला आहे. दिनांक 13/ 3 /2020 रोजी विभागीय चौकशी रिपोर्टमध्ये फक्त संतोष गुल्हाने यांचेवर ठपका ठेवलेला आहे. तरी विनंती की वरील विषयानुसार या अर्जासोबत जोडलेल्या कागदोपत्री पुराव्यानुसार महसूल यंत्रणेने हा अर्ज मिळाले पासून 15 दिवसाच्या आत दखल न घेतल्यास मंगळवार दि. 3/ 11 /2020 रोजी गणेश कुंज सोसायटीतील सर्व सदनिकाधारक आपले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी बारा वाजता आत्मदहन करणार आहेत. सदनिकाधारक आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे बाबत वैयक्तिक जबाबदार असाल असे संतोष मोहिते व इतरांनी दिलेल्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे .

हे निवेदन विभागीय आयुक्त पुणे ,पोलिस अधीक्षक सातारा, उपविभागीय पोलिस अधिकारी फलटण, तहसीलदार खंडाळा ,पोलीस निरीक्षक शिरवळ,राज्यमंत्री बच्चू कडू  यांना माहितीसाठी मुख्य प्रवर्तक संतोष मोहिते व इतरांनी  निवेदन दिलेले आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!