सातारा दि. 3 (जिमाका) : “माझे कुटूंब माझी जबाबदारी” अभियानातंर्गत राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी पाटण मतदारसंघातील प्रमुख गावांमध्ये जावून सामाजिक अंतर पाळत स्पिकरवरुन या अभियानाची जनजागृती केली.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी “माझे कुटूंब माझी जबाबदारी” ही संकल्पना राज्यातील जनतेच्या समोर ठेवली आहे. मुख्यमंत्री यांच्या या संकल्पनेची जनजागृती गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सामाजिक अंतर पाळत स्पिकरवरून ग्रामीण भागातील नागरिक,महिला व युवक-युवतींना या अभियानाचे महत्व पटवून दिले. कोरोना संसर्गापासून आपणच आपला बचाव केला पाहिजे याकरीता हे अभियान खुप महत्वपुर्ण आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील कुटुंबांतील प्रत्येकाने सतत मास्क वापरा, बाहेरुन घरात आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवा, घरातून बाहेर गेल्यानंतर सामाजिक अंतर पाळा या महत्वाच्या बाबींचे आवाहन करीत अनेक गांवागांवात जावून गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी जनजागृती केली.