सातारा दि.1 (जिमाका): कोरोना संकटावर मात करण्यासाठी माझे कुटुंब माझी जबादारी ही मोहिम सुरु केली आहे. या मोहिमेंतर्गत कोरोना संसर्गापासून बचाव कसा करावा याबाबतची घरोघरी जावून जनजागृती करण्यात येत आहे. जनजागृतीचा एक भाग म्हणून या मोहिमेंतर्गत सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने फेसबुक प्रश्नमंजुषा स्पर्धा, छायाचित्र स्पर्धा, व्हिडीओ स्पर्धांचे करण्यात आल्या आहे, या स्पर्धांमध्ये जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.
*फेसबुक प्रश्न मंजुषा स्पर्धा :* सदरची स्पर्धा सातारा जिल्ह्यासाठीच्या सर्व नागरिकांसाठी खुली राहील. ‘माझे कुटूंब, माझी जबाबदारी या उपक्रमांतर्गत ‘कुटुंबाची साथ – कोरोनावर मात’ या विषयावर सोशल मिडीयावरील जिल्हा माहिती कार्यालयाच्या https://www.facebook.com/
*छायाचित्र स्पर्धा :* ही स्पर्धा सातारा जिल्ह्यासाठीच्या सर्व नागरिकांसाठी खुली राहील. ‘माझे कुटूंब, माझी जबाबदारी या उपक्रमांतर्गत ‘कुटुंबाची साथ – कोरोनावर मात’ या विषयाचे छायाचित्र (Photo) असावे.स्पर्धकाने छायाचित्र व त्यासोबत आपले नांव, वय, मोबाईल क्रमांक, पत्ता टाईप करुन दिनांक 10 ऑक्टोबर 20200 रोजी सायं. 4.00 वाजेपर्यंत [email protected] किंवा [email protected] या इमेल पत्यावर सादर करावे. सर्व प्राप्त छायाचित्रांची जिल्हास्तरावर परिक्षकांमार्फत परिक्षण केल्यानंतर निवड करण्यात येईल.
*व्हिडीओ स्पर्धा :* स्पर्धा सातारा जिल्ह्यासाठीच्या सर्व नागरिकांसाठी खुली राहील. ‘माझे कुटूंब, माझी जबाबदारी या उपक्रमांतर्गत ‘कुटुंबाची साथ – कोरोनावर मात’ या विषयावर आपल्या कल्पनाशक्तीवर जास्तीत जास्त 5 मिनीटापर्यंत व्हिडीओ तयार करावा. आपले व्हिडिओ पाठवितांना सोबत आपले नांव, वय, मोबाईल क्रमांक, पत्ता टाईप करुन 10/10/2020 सायं. 4.00 वाजेपर्यंत [email protected] किंवा [email protected] या इमेल पत्यावर सादर करावेत. प्राप्त व्हिडिओंची परिक्षकांमार्फत परिक्षण करुन जिल्हास्तरावर पात्र स्पर्धकाची निवड करण्यात येईल.
या विविध स्पर्धेतील पहिल्या क्रमांकास 5 हजार, दुसऱ्या क्रमांकास 3 हजार व तिसऱ्या क्रमांकास 2 हजार रुपये बक्षिस व ‘कोरोना योध्दा’ म्हणून प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले आहे.