पुण्यशलोक अहिल्याबाई होळकर रोपवाटीका योजनेसाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन

 

            सातारा दि. 29 (जिमाका) : मागील 2 ते 3 वर्षापासुन भाजीपाला पिकाचे निर्यातक्षम व विषमुक्त उत्पादन करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. त्यामुळे भाजीपाला बियाणांच्या चांगल्या जाती व रोपांची मागणी वाढत आहे. त्यादृष्टीने नियंत्रित वातावरणामध्ये तयार झालेली कीड व रोगमुक्त भाजीपाला रोपांची मागणी  मोठ्या प्रामाणात वाढत आहे. त्यासाठी शासनाने राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत  पुण्यश्लोक अहित्यादेवी होळकर रोपवाटीका योजना सुरु केली आहे. या योजनेसाठी अर्ज करु इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी  दि. 2 ऑक्टोबर ते दि. 19 ऑक्टोबर अखेर शासनाच्या Maha-DBT या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने किंवा तालुका कृषि अधिकारी कार्यालयात ऑफलाईन पध्दतीने विहित नमुन्यात अर्ज करावेत असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, सातारा यांनी केले आहे.

            अर्जाचा नमुना व अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा.

 

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!