गोखळी(प्रतिनिधी) :
मौजे खटकेवस्ती येथे सरपंच श्री.बापूराव गावडे. उपसरपंच व सदस्य यांच्या प्रयत्नातून उभा राहिलेल्या 35 हजार लिटर पाण्याच्या टाकीचे उद्घाटन गोखळी व खटकेवस्ती चे पोलीस पाटील श्री विकास शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष गोखळी चे सरपंच श्री. मनोज (तात्या)हरिभाऊ गावडे होते.
यावेळी या या कार्यक्रमाला खटकेवस्ती चे सरपंच श्री. बापूराव गावडे उपसरपंच श्री. नवनाथ गावडे (पाटील) तंटामुक्ती अध्यक्ष श्री. बजरंग खटके ग्रामपंचायत सदस्य श्री. काका खटके श्री योगेश गवडे (पाटील) श्री.सचिन खटके श्री.तानाजी सस्ते व खटकेवस्ती ग्रामपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते.