फलटण : लॉकडाऊनच्या काळात शासनाच्या नियमावलीत आधीन राहून मोजक्या लोकांच्यात व मानपान बाजूला सारुन साध्या पद्धतीने पंधरा विवाह उरकले.
त्यांच्या वैवाहिक जीवनाला सुरुवात झाली.वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव ,आर्थिक चणचण,परतीच्या पावसाचा धुमाकूळ,शेती मालाचे भाव गडगडले,दुधाचा धंदा आतबट्यात,बाजरी सोयाबीन भाजीपाल मातीमोल,ऊस जमीनदोस्त,लागणी पिवळ्याचुटूक पडल्याने बळीराजाचे कंबरडे मोडले.अश्यातच अधिक मास आल्याने त्याच्या चिंतेत भर पडली.आपल्या चालीरिती,रुढी परंपरा चांगल्या तश्याच काही कालबाह्य आहेत.आपण रिन काढून सण साजरे करतो.
अधिक मासात नवदांपत्याला संपूर्ण पोशाख,अनारसे व वाण म्हणून दान देण्याची रुढ परंपरा आहे. अश्यातच ग्रामीण कथाकार प्रा.रवींद्र कोकरे यांनी विवाहबद्ध जोडप्यांशी प्रत्यक्ष व भ्रमणध्वनीवरुन आवाहन केले की ,”अश्या रुढी परंपरेला फाटा देऊन सासू सास-यांना खर्चात न पडता कोरोनाच्या काळात सामाजिक अंतर पाळून त्यांनाच आधार द्यावा .” प्रा.कोकरे यांनाच्या आवाहनाला दोन्हीही कडील मंडळीने प्रतिसाद दिल्याने कन्येच्या आई वडीलांचा जीव भांड्यात पडला आहे.
“समाज्यातील कालबाह्य,अनाठायी खर्चाला फाटा देऊन जगण्यातील आनंद घेऊन लवकरच कोरोना मुक्त होऊ या.आपण आपल्या परीने कार्य करु.तेवढाच आपला खारीचा वाटा.” असे प्रतिपादन प्रा. रवींद्र कोकरे यांनी केले.