आदर्की येथे भाजपाचे सुरेश निंबाळकर यांच्या सहकार्याने १५० झाडांचे वृक्षारोपण

वृक्षारोपण करताना भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते



फलटण – पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व भारतीय जनता पार्टी चे सातारा जिल्हाध्यक्ष विक्रमजी पावसकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी तर्फे फलटण तालुक्यात सेवा सप्ताह म्हणून साजरा केला जात आहे.

पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज फलटण तालुक्यातील आदर्की येथे भाजपचे फलटण तालुका सरचिटणीस सुरेश निंबाळकर यांच्या सहकार्याने १५० झाडांचे वृक्षारोपण आदर्की येथील माध्यमिक विद्यालय येथे संपन्न झाले. भारतीय जनता पक्षाचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत व वाठारचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज कलापट यांच्या अध्यक्षतेखाली सदर वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वी झाला. आदर्की येथील शाळेच्या समोर १५० विविध प्रकारची झाडे लावून पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी व वृक्षारोपणाचे महत्व जनतेला कळावे यासाठी हा सोहळा करण्यात आला. तसेच आदर्की गावामध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. अशा अनोख्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

यावेळी भारतीय जनता पार्टी चे फलटण तालुकाध्यक्ष विष्णुपंत लोखंडे, फलटण नगर पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष राजेश शिंदे, कोरेगाव तालुका किसान मोर्चा उपाध्यक्ष सचिन जाधव, आदर्की खुर्द चे उपसरपंच दत्तू कांबळे, उद्योजक आघाडीचे सचिन राक्षे, नवल जाधव व ग्रामस्थ व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
 
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!