फलटण :- सध्या जगभरात पसरत असलेला कोविड १९ अर्थात कोरोना या संसर्गजन्य आजाराचे पार्श्वभूमीवर सदगुरू व महाराजा उदयोग समुहाचे शिल्पकार दिलीपसिंह भोसले यांनी सेवकांचेसाठी स्टार हेल्थ पॉलीसीच कोरोना कवच प्रत्येक सेवकांना रूपये ५ लाखापर्यंतची पॉलीसी उतरविणेत आली . कोरोना संकटात सेवकांना आर्थिक भार जास्त होवु नये व संरक्षण म्हणुन सदरची स्टार हेल्थ पॉलीसी उतरविणेत आली आहे . या पॉलीसीचा सदगुरू पतसंस्थेतील ३९ सेवकांनी , महाराजा मल्टीस्टेटमधील २१ सेवकांनी व सहकार महर्षि हणमंतराव दिनकरराव पवार या संस्थेच्या २१ सेवकांनी असे एकुण ८१ सेवकांनी सदर पॉलीसीचा लाभ घेतला अशी माहीती सदगुरू व महाराजा उदयोग समुहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदिप जगताप यांनी दिली. या पॉलीसीचा सेवकांना अनपेक्षितपणे उदभवणारे परिस्थीतीत फायदा होईल म्हणुन ही पॉलीसी उतरविणेत आली आहे असे सदगुरू व महाराजा उदयोग समुहाचे शिल्पकार श्री . दिलीपसिंह भोसले यांनी सांगितली .