एकशे बावीस कोरोना बाधित रुग्णांची जिल्हा प्रशासनाने ३३ लाख रुपयांपेक्षा जास्तरक्कम परत मिळवून दिली


सातारा दि.22 (जिमाका): कोरोना रुग्णांवर केलेल्या उपचारांच्या देयकाबाबत जिल्हा प्रशासनाकडे अनेक तक्रारी येत होत्या. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आदेश काढून नेमणुक केलेल्या पथकांकडून 1 हजार 112 कोरोना बाधितांच्या उपचारांच्या देयकांची तपासणी केली असता 122 जणांचे देयके अवाजवी आकारण्यात आल्याचे निदर्शनास आले. या 122 रुग्णांकडून  33 लाख 94 हजार 856 रुपये जास्तीचे आकारण्यात आलेली  रक्कम त्यांना  परत करण्यात आली.
कोरोना ( कोविड- १९ ) बाधित रुग्णांना  रुग्णालयांकडून वाजवी पेक्षा जास्त देयक घेतले आहे, अशी तक्रार असलेल्या रुग्णांच्या देयकांची तपासणी करण्यासाठी तपासणी पथकाद्वारे नोडल अधिकाऱ्याची नेमुणक जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केली आहे. जिल्ह्यातील विविध खासगी रुग्णालयांनी उपचार घेऊन घरी गेलेल्या 122 कोरोना बाधित रुग्णांकडून 96 लाख 10 हजार 770 रुपये आकारण्यात आले होते.  या पथकाकडून 122 कोरोना बाधितांच्या देयकांमध्ये जादा आकारण्यात आलेली  तब्बल 33 लाख 94 हजार 856 इतकी रक्कम कमी करुन ही रक्कम परत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले आहेत.
कोराना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हा प्रशासनाने विविध खासगी रुग्णालये कोराना आजारावर उपचार करण्यात येत आहे. परंतु या रुग्णालयांकडून रुग्णांना देण्यात येणारे देयक हे शासनाने निर्धारित केलेल्या दराप्रमाणे देण्यात येते की नाही याची तपासणी करण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आदेश काढुन रुग्णालयनिहाय देयकाच्या तपासणीसाठी पथक तयार करुन प्रत्येक पथकात एक नोडल अधिकारी व एका ऑडीटरची नेमणुक करण्यात आलेली आहे. विविध रुग्णांलयाकडून 122 कोरोना बाधितांकडून  96 लाख 10 हजार 770 रुपये आकारण्यात आलेले होते. जिल्हाधिकारी यांनी नेमणुक केलेल्या पथकाकडून रुग्णालयनिहाय देयकाची तपासणी करण्यात आली. तपासणी केल्यानंतर 33 लाख 94 हजार  856 रुपये इतके देयक कमी करुन 62 लाख 73 हजार 554 रुपये इतकेच उपचाराचे देयक देय करण्यात आलेले आहे.
यापुढेही रुग्णालयांच्या तपासणीसाठी तयार करण्यात आलेल्या पथकांकडुन कोरोना बाधितांवर केलेल्या उपचारांच्या देयकांची तपासणी वेळोवेळी करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!