फलटण :कोरोना आपत्तीच्या काळात समाजोपयोगी विविध उपक्रम राबवित असताना महाराजा उद्योग समूहाच्या वतीने नागरिकांची शारीरिक क्षमता वाढावी या हेतूने भडकमकर नगर,फलटण येथे ओपन जिम सुरू करून या माध्यमातून समाजाच्या हितासाठी महाराजा उद्योग समूहाने आणखी एक पाऊल टाकले आहे.
फलटण शहरात व तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे .ऑक्सीजन व व्हेंटीलेटर अभावी मयत रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत असल्याचे दिसत आहे. नागरिकांच्यात ऑक्सीजन व रक्तदाब पातळी व्यवस्थित राहावी यासाठी शारीरिक कसरत व व्यायामाची आवश्यकता आहे, यादृष्टीने भडकमकरनगर,फलटण येथे हे ओपन जिम सुरू करीत असल्याचे महाराजा मल्टी स्टेट चे व्हाईस चेअरमन रणजितसिंह भोसले यांनी सांगितले. या जिमचा शुभारंभ नगराध्यक्षा निता नेवसे,जेष्ठ नगरसेविका श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर व मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांच्या हस्ते रविवार दि 20 रोजी सायं. 5 वाजता होणार आहे. सद्गुरू व महाराजा उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांच्या मार्गदर्शन व नगरसेविका ॲड. सौ. मधुबाला भोसले यांचे सहकार्य यासाठी लाभत आहे. परिसरातील नागरिकांनी या ओपन जिम चा वापर करून स्वतःची शारीरिक क्षमता वाढवावी व कोरोनाशी असलेला आपला लढा यशस्वी करावा असेही रणजितसिंह भोसले यांनी सांगितले.