शहीद नायक सचिन जाधव यांच्यावर शासकीय इतमामत अंत्य संस्कार राज्याचे सहकार मंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील आणि गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई यांनी पुष्पचक्र अर्पण करून वाहिली आदरांजली

सातारा दि.18 (जिमाका): सातारा जिल्ह्यातील दुसाळे ता.पाटण येथील शहीद नायक सचिन संभाजी जाधव  यांच्यावर शासकीय इतमामत आज अंतीम संस्कार करण्यात आले. यावेळी त्यांना मानवंदना दिली. शासनाच्या वतिने राज्याचे सहकार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई यांनी पुष्प चक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. 
       यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, पाटणचे उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी  विजयकुमार पाटील,  पाटणचे तहसीलदार समीर यादव यांनीही आदरांजली वाहिली. 
   सातारा जिल्ह्यातील 111 इंजिनियर रेजिमेंटचे नायक सचिन संभाजी जाधव यांना दि. 16 सप्टेंबर 2020 रोजी सैन्यामध्ये सेवा बजावताना वीर मरण प्राप्त झाले होते. 
दुसाळे गावातून सजवलेल्या गाडीतून त्यांची अंत्य यात्रा काढण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व ते नियम पाळून ग्रामस्थांनी आपल्या शूर भूमिपुत्राचे  अतिशय शोकाकुल वातावरणात शेवटचे दर्शन घेतले.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!