महात्मा एज्युकेशन सोसायटीचे,आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालायचे मुख्याध्यापक कानिफनाथ दत्तात्रय ननावरे यांना नाशिक येथील बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाचा राष्ट्रीय दर्पणकार शिक्षक रत्न पुरस्कार जाहीर

फलटण- येथील महात्मा एज्युकेशन सोसायटीचे,आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालायचे मुख्याध्यापक कानिफनाथ दत्तात्रय ननावरे यांना नाशिक येथील बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाचा शिक्षक दिनाच्या निमित्ताने देण्यात येणारा राष्ट्रीय दर्पणकार शिक्षक रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्कारा बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.कानिफनाथ ननावरे हे एकवीस वर्ष शैक्षणिक क्षेत्रात असून पंधरा वर्ष ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालायचे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत,विद्यालयाच्या विकासासाठी संस्थेच्या मार्गदर्शनाखाली ते काम करीत असून चालू वर्षीचा इयता १० वी चा निकाल हा ९५% लागला आहे.हा पुरस्कार जाहीर झाल्या बद्दल कानिफनाथ ननावरे यांनी,मराठी वृतपत्रसृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावाच्या संस्थेकडून मिळालेला पुरस्कार हा बाळशास्त्रींचा आशीर्वाद असून, संस्थेचे अध्यक्ष सुभाषराव शिंदे,सेक्रेटरी रवींद्र बेडकीहाळ,शालेय समिती अध्यक्षा सौ.अलकाताई बेडकिहाळ यांनी मला संस्थेत काम करण्याची संधी दिली व माझ्या कामा प्रती विश्वास दाखविला या बद्दल संस्थेप्रती मी कृतज्ञ आहे.
या पुरस्कारा बद्दल संस्थेचे अध्यक्ष सुभाषराव शिंदे,सेक्रेटरी रवींद्र बेडकीहाळ,शालेय समिती अध्यक्षा सौ.अलकाताई बेडकिहाळ,प्राथमिक शालेय समिती अध्यक्ष रवींद्र बर्गे,जेष्ठ सदस्य बापूसाहेब मोदी,शांताराम आवटे,प्रशासन अधिकारी बापूराव देशपांडे,ज्ञानेश्वर पिसाळ,माध्यमिक विद्यालय सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी वर्ग यांनी श्री.ननावरे सर यांचे अभिनंदन केले आहे.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!