सर्वेक्षण मध्ये नागरिकांनी सहकार्य करा: सुरेखा चौधर

रुई मध्ये  प्रशिक्षण दरम्यान मार्गदर्शन करताना आरोग्य कर्मचारी व व्यासपीठावर सुरेखा चौधर,पांडुरंग चौधर व इतर मान्यवर (छाया अनिल सावळेपाटील)
बारामती: बारामती नगरपरिषद च्या माध्यमातून ‘माझे कुटूंब ,माझी जवाबदारी’ या कार्यक्रम अंतर्गत कोरोना च्या पार्श्वभूमीवर प्रत्येक कुटूंबाचे सर्वेक्षण केले जाणार असून नागरिकांनी नगरपरिषद च्या कर्मचाऱ्यांना आरोग्य विषयक सत्य माहिती सांगणे गरजेचे असून त्या माध्यमातून कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडू शकतील व कोरोना चा प्रचार व प्रसार होऊ नये म्हणून मदत होईल असे प्रतिपादन स्थानिक नगरसेविका सुरेखा चौधर यांनी केले.
 प्रभाग क्र -४ रुई गावठाण या ठिकाणी बारामती नगरपरिषद च्या वतीने स्वयंसेवक व पदाधिकारी यांना माझे कुटूंब, माझी जवाबदारी अंतर्गत प्रशिक्षण देण्यात आले या वेळी सुरेखा चौधर बोलत होत्या. या प्रसंगी  प्रांताधिकारी दादासो कांबळे,गटविकास अधिकारी राहुल काळभोर राष्ट्रवादी चे नेते  पांडुरंग चौधर व  
 गोरख चौधर,नितीन पानसरे, विशाल जगताप, लक्ष्मण चौधर,आबा खाडे,
अजय चौधर,राम चौधर,हर्षद पानसरे
राहुल बापु चौधर, नवनाथ  चौधर,आतुल  कांबळे, गजानन  चौधर ,सुरज  चौधर ,बाळा  चौधर 
आक्षय घाटे ,रवि निकम, रोहित कांबळे आदी स्वयंसेवक उपस्तीत होते.या वेळी कर्मचारी यांनी तापमान तपासणी,ऑक्सिजन लेव्हल तपासणी व थंडी,ताप,खोकला आदी लक्षणे असल्यास घ्यावयाची दक्षता,कोरोना बाबत समज व गैरसमज  आदी बाबत सखोल मार्गदर्शन केले 
 
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!