शहरी अथवा ग्रामीण भागात दुकानांमध्ये ग्राहकांनी सोशल डिस्टन्सींगचे पालन न केल्यास दंडासह सात दिवस दुकान बंदची करवाई — जिल्हाधिकारी यांनी केले नवे आदेश जारी

सातारा दि. 17 (जिमाका) : देशांतर्गत कोरोना विषाणू संसर्ग बाधित रुग्ण आढळत आहेत. यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व विषाणूचे संसर्गात अधिका वाढ होवू न देता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक आहे. कोविड-19 चे संक्रमण रोखण्याच्या अनुषंगाने सोशल डिस्टन्सींग व नियमांचे पालन करण्याबाबत विविध प्रकारचे आदेश पारित केलेले आहेत. परंतु अद्यापही सोशल डिस्टन्सींगचे पालन केले जात नसल्याची बाब निर्दशनास आलेली आहे.

जिल्हाधिकारी शेखर सिंह तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रधिकरण यांनी असे आदेश दिले आहेत की, सातारा जिल्ह्यातील कोणत्याही शहरी अथवा ग्रामीण भागातील सर्व प्रकारच्या दुकानांमध्ये ग्राहकांनी एकमेकांमध्ये 6 फुटापेक्षा जास्त अंतर न ठेवल्याचे/ सोशल डिस्टन्सींगचे पालन न करता गर्दी केल्याचे निर्दशनास आल्यास खालीलप्रमाणे कारवाई करणे व दंड आकारण्याचे अधिकार संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेचे अधिकारी/कर्मचारी यांना प्रदान करण्यात येत आहेत. वसूल करण्यात आलेला दंड संबंधितांनी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जमा करावा.

नगरपालिका/नगरपंचायत/नगरपरिषद कार्यक्षेत्रात (शहरी भाग) रुपये 3000/- दंडात्मक रक्कम आकारण्यात येईल. जर एखाद्या शहरी भागातील कोणत्याही प्रकारच्या दुकानात ग्राहकांनी एकमेकांमध्ये 6 फुटापेक्षा जास्त अंतर न न ठेवल्याचे/ सोशल डिस्टन्सींगचे पालन न करता गर्दी केल्याचे निर्दशनास येईल त्यावेळी संबंधित दुकानदारावर दंडात्मक कारवाई करुन सदरचे दुकान 7 दिवसांपर्यंत सक्तीने बंद करण्यात यईल.

ग्रामपंयाचत कार्यक्षेत्रात (ग्रामीण भागात) रुपये 2000/- दंडात्मक रक्कम आकारण्यात येईल. जर एखाद्या ग्रामीण भागातील कोणत्याही प्रकारच्या दुकानात ग्राहकांनी एकमेकांमध्ये 6 फुटापेक्षा जास्त अंतर न न ठेवल्याचे/ सोशल डिस्टन्सींगचे पालन न करता गर्दी केल्याचे निर्दशनास येईल त्यावेळी संबंधित दुकानदारावर दंडात्मक कारवाई करुन सदरचे दुकान 7 दिवसांपर्यंत सक्तीने बंद करण्यात यईल.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!