बारामती:
बारामती एमआयडीसी मधील उद्योजकांची संघटना अंत्रप्रिनिअर क्लब च्या अध्यक्ष शहाजीराव रणवरे तर उपाध्यक्ष पदी अरुण म्हसवडे यांची निवड करण्यात आली.सचिव शंकरराव नायर खजिनदार अनिल काळे,आदी उद्योजकांची निवड करण्यात आली.
या वेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘वर्तमान व भविष्यातील उदोजक’ या विषयावर चर्चा करण्यात आली.
उद्योजक च्या अडीअडचणी शासन दरबारी मांडून त्या सोडवण्यासाठी प्रत्यन करू व एमआयडीसी च्या माध्यमातून पाणी,रस्ता,वीज व इतर सेवा वेळेत मिळावेत म्हणून पाठपुरावा करू असे निवडीनंतर शहाजीराव रणवरे यांनी सांगितले.
मावळते अध्यक्ष शंकरराव कचरे यांनी वर्षभरातील कार्याचा आढावा घेतला. नरेश तुपे यांनी आभार मानले.
क्लब चे सदस्य व उद्योजक दत्ता कुंभार,प्रमोद काकडे,सचिन माने,पंढरीनाथ नाळे, नरेश तुपे,सुनील गोळे,संजय खटके,आदींनी शुभेच्छा दिल्या .