फलटण :अजित तांबे यांनी हिवरे ता . कोरेगाव येथील आदर्श शेतकरी अजित खता (एम एस सी ॲग्री)यांच्याकडून प्रशिक्षक घेऊन सन 2004 साली आपल्या शेतामध्ये रेशीम उद्योग सुरू केलाएक १ एकर क्षेत्रामध्ये तुतीची लागवड करून त्यांनी व्यवसायाला सुरुवात केली व त्यात सातत्य राखले आहे
शासनाच्या अनुदानातून त्यांनी चॉकी सेंटर व 80 x 30 फूट आकाराचे शेड त्यांनी आपल्या शेतामध्ये उभारले आहे .आता त्यांनी आपल्या २ एकर शेतामध्ये तुतीची लागवड केली आहे प्रत्येकी 250 अंडी प्रजननाची एक बॅच असे ते वर्षातून पाच बॅचेस घेतात रेशीम शेतीला ऊस शेतीपेक्षा कमी पाण्याची आवश्यकता असते तसेच त्यांनी आपल्या शेतामध्ये ठिबक सिंचनाचा वापर केला आहे तुतीची पाने दर्जेदार मिळवण्यासाठी ते शेणखताचा अधिक वापर करतात ते रासायनिक खतांचा नाममात्र वापर करतात
100 अंडी प्रजनना पाठीमागे 70 ते 80 किलो रेशीम कापसाचे उत्पादन मिळते प्रति किलो 500 रुपये प्रमाणे त्याला बाजार भाव मिळतो पूर्वी ते रामनगर (कर्नाटक )येथे माल विक्रीसाठी नेत असत परंतु आता बारामती येथे बाजारपेठ उपलब्ध झाल्यामुळे ते आता माल बारामती येथे विक्रीस नेत आहेत . त्यामुळे वाहतूक खर्चात फार मोठी बचत होते . त्यांना या व्यवसायात त्यांची पत्नी सौ अश्विनी तांबे व मुले मदत करतात त्यामुळे मजुरीवरील खर्चात कपात होते त्यामुळे १ एकर शेतीमध्ये त्यांना रु ३ लाख रुपयांचा नफा मिळतो . त्यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी हा व्यवसाय खूपच फायदेशीर आहे त्यांच्या या अनोख्या उपक्रमाची साम टीव्ही व आकाशवाणीने नोंद घेतली आहे .
कृषी महाविद्यालय पुणे येथे अंतिम वर्षात शिकत असणाऱ्या कु . प्रज्ञा बनकर हिने प्रत्यक्ष त्यांच्या शेतात जाऊन या उपक्रमाची माहिती घेतली आहे कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी हा प्रत्यक्ष शेतीचा अनुभव अभ्यासपूर्ण असा आहे .
अजित तांबे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून रेशीम उद्योगामध्ये विक्रमी उत्पादन घेतले आहेत्यांचे हे यश परिसरातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहे प्रयोगशील शेती बाबत त्यांनी आम्हाला केलेले मार्गदर्शन प्रेरणादायी ठरेल असा विश्वास आहे .
– प्रज्ञा बनकर अभ्यासक
nice
Good job